Such a contrived figure to get drunk 
विदर्भ

दारू गाळण्यासाठी अशी लढवली शक्‍कल

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : दारूबंदी असलेल्या वर्ध्यात विक्रेत्यांकडून अनेक क्‍लृप्त्या लढविण्याचा इतिहास आहे. यात आणखी एक कडी म्हणजे वायगाव (निपाणी) येथील एका गावठी दारूविक्रेत्याने तर कमालच केली. त्याने दारू गाळण्यासाठी गोठ्याच्या खाली तळघर केल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून केलेल्या कारवाईतून पुढे आले आहे. या कारवाईत पोलिसांनी पावणेदोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून अशी अनोखी शक्‍कल लढविणाऱ्या सुमेश नगराळे (वय 34) याला अटक करण्यात आली आहे.


वायगाव (निपाणी) येथील एक दारूविक्रेता शेतातील गोठ्यात तळघर तयार करून तिथे दारू गाळत असल्याची माहिती पोलिसांना माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी सुमेध नगराळे यांच्या शेतातील गोठ्यावर छापा टाकला.
यावेळी सुमेध गोठ्यावर हजर होता. यावेळी पंचासमक्ष या गोठ्याची पाहणी केली असता येथे कापसाचे गाठोडे ठेवल्याचे दिसून आले. गाठोडे बाजूला सरकवून बारकाईने पाहणी केली असता तेथे भुयारी मार्ग सापडला. तेथून शीडीने तळघरातील खोलीत प्रवेश के ला असता
या खोलीत 15 ड्रममध्ये अंदाजे तीन हजार लिटर मोहा सडवा रसायन मिळून आले. यातून मोटारपंपाच्या सहाय्याने सडवा बाहेर आणून त्यातून दारू गाळत असल्याचे पुढे आले. कारवाईमध्ये सर्व मोहा सडवा पंचासमक्ष नष्ट करून व इतर भट्टी साहित्याचा नाश करण्यात आला आहे. तसेच दोन मोटारपंप जप्त करण्यात आले.

पंपाने घ्यायचा सडवा बाहेर

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत हा दारूविक्रेता तळघरात असलेला दारूचा सडवा पंपाने बाहेर घेत असल्याचे पुढे आले आहे. यामुळे हा प्रकार कोणाच्याही लक्षात येत नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT