Suffocating breath due to dust pollution in the mine 
विदर्भ

खाणीतील धूळप्रदूषणाने गुदमरतोय श्‍वास; मानवी आरोग्य, शेतीवर विपरीत परिणाम

आनंद चलाख

राजुरा (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणीत धुळीमुळे कामगारांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. शिवाय ब्लास्टिंग, वाहतुकीमुळे धुळीच्या प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. याचा दुष्परिणाम मानवी आरोग्य व शेती उत्पादनावर होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचा श्‍वास गुदमरत आहे.

वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रात गोवरी, सास्ती, पोवनी, गोवरी डीप या खाणी आहे. या खाणीतून मोठ्या प्रमाणावर धूळ प्रदूषण करण्यात येते. मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उडत असताना वेकोलिचे अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही. केवळ थातूरमातूर पाणी मारण्याचा प्रकार सुरू आहे. कोळसा खाणीत धूळ प्रदूषण होऊन कामगारांचे आरोग्य धोक्‍यात येऊ नये यासाठी वेकोलिने ठोस उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

मात्र, वेकोलि याकडे दुर्लक्ष करीत आहे. कोळसा वाहतुकीमुळे या भागातील रस्त्यांचे तीनतेरा वाजले आहेत. धुळीचा मानवी आरोग्य, शेतीवर परिणाम होत आहे. वेकोलिमधून काढण्यात येणारी माती ढिगारे शेतीसाठी मारक ठरत आहेत. अनेक गावांना बॅकवॉटरचा फटका पावसाळ्यात बसतो.

धूळ प्रदूषणात झाली वाढ
वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे धूळ प्रदूषणात वाढ झाली आहे. कोळशाच्या धुळीमुळे शेतपिकांवर विपरित परिणाम झाला आहे. कापूस काळवंडले आहे. मानवी आरोग्यावर दुष्परिणाम झाले आहेत. मात्र, वेकोलिचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे.
- भास्कर जुनघरी,
शेतकरी, गोवरी

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT