Suicide of a salon professional due to financial difficulties 
विदर्भ

आर्थिक अडचणीतून सलून व्यावसायिकाने घेतला हा टोकाचा निर्णय... 

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : ऊर्जानगरजवळील समतानगरातील एका सलून व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. 15) उघडकीस आली. स्वप्नील चौधरी (वय 27) असे मृत सलून व्यावसायिकाचे नाव आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. तेव्हापासून सलूनची दुकाने बंद होती. यातून निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. दरम्यान, त्याच्या आत्महत्येचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही. 

ऊर्जानगर परिसरात समतानगर येते. याच परिसरात स्वप्नील चौधरी याचे सलूनचे दुकान होते. मार्च महिन्यात कोरोना विषाणूने हातपाय पसरविले. त्यामुळे 21 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. तेव्हापासून उद्योगधंदे बंद होते. स्वप्नील चौधरी याचे दुकानही मार्च महिन्यापासून बंद होते. मधल्या काळात प्रशासनाने काही दिवस सलूनची दुकाने उघडण्याची मुभा दिली होती. 

मात्र, नंतर परत दुकाने बंद करण्याच्या सूचना सलून व्यवसायिकांना दिल्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून दुकान बंद पडल्याने स्वप्नील चिंतित होता. सोमवारी (ता. 15) सकाळी शेजारी राहणाऱ्या एका युवकाने स्वप्नीलला उठविण्यासाठी आवाज दिला. मात्र, आतून प्रतिसाद मिळाला नाही. स्वप्नीलला आवाज देऊनही तो उठत नसल्याने परिसरातील लोक जमा झाले. 

त्यांनी दार उघडून बघितले असता स्वप्नील गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला. त्यानंतर याची माहिती दुर्गापूर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आई-वडील नसल्याने स्वप्नील घरी एकटाच राहत होता. लॉकडाउनचा मोठा फटका सलून व्यवसायिकांना बसला. दुकान बंद असल्याने उपासमारीचा सामना करावा लागत होता. यातूनच त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT