Sunflag company 
विदर्भ

अरेरे! भंडाऱ्यातील या नामांकित कंपनीने 900 कर्मचाऱ्यांना डावलले...

सकाळ वृत्तसेवा

वरठी (जि. भंडारा) : येथील सनफ्लॅग आयर्न ऍण्ड स्टील कंपनी हा कारखाना 50 टक्के कामगारांच्या भरवशावर सुरू करण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. कारखाना सुरू करण्यात आला. परंतु, 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी कामगारांवर तो चालविला जात आहे. जवळपास 900 नियमित, कंत्राटी व स्टाफ कामगारांना काम देण्यापासून वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. व्यवस्थापनाने जाणीवपूर्वक अन्याय केल्याचा आरोप करीत बेमुदत उपोषणावर बसण्याचा इशारा दिला आहे. 

कोरोना संसर्गामुळे सामाजिक दुरीकरण व सुरक्षेच्या दृष्टीने 50 टक्के कामगारांची उपस्थिती ठेवून कारखाना सुरू करण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. याच गोष्टीचा फायदा घेत सनफ्लॅग कारखान्याने कर्मचारी कपातीचे धोरण अवलंबिले असून काही मोजक्‍याच लोकांना कामावर बोलाविले आहे. कारखान्यात जवळपास 100 स्थायी टेक्‍निशियन, 600 कंत्राटी कामगार, 200 स्टाफ कामगार असून त्यांना कामापासून वंचित ठेवल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. सर्व कामगारांना एक दिवसाआड समप्रमाणात काम द्यावे, अशी कामगार संघटनेची मागणी आहे. मात्र, व्यवस्थापक मंडळ याकडे दुर्लक्ष करीत आहे.

सनफ्लॅग कारखाना कोविड-19 च्या संक्रमणामुळे 24 मार्चला बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यामुळे सनफ्लॅगमधील उत्पादन थांबविण्यात आले. याच दरम्यान कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करू नये, कोणालाही कामावरून कमी करू नये, असेही केंद्र सरकारचे निर्देश होते. तरीसुद्धा मार्च- एप्रिल महिन्याचे वेतन कपात करण्यात आले. 15 एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांनी 50 टक्‍के कामगारांवर कंपनी चालू करण्यास परवानगी दिली. 22 मेपासून कारखान्याचे उत्पादन पूर्वीप्रमाणे सुरू झाले. मात्र, अशावेळी मनुष्यबळाची गरज असतानाही जवळपास 500 टेक्‍निशियन, 600 कंत्राटी कामगार, 200 स्टाफ कामगारांना कामापासून वंचित ठेवण्यात आले.

मजदूर सभा व भाजप कंत्राटी कामगार संच यांनी व्यवस्थापक मंडळाशी चर्चा करून सर्व कामगारांना समप्रमाणात काम देण्याची मागणी केली. मात्र, तरीसुद्धा व्यवस्थापक मंडळाने दाद दिली नाही. यावर कामगार संघटनांनी साहायक कामगार आयुक्त यांच्याकडे तक्रार केली. तेव्हा कामगार आयुक्तांनीसुद्धा 1 जून व 9 जून रोजी बैठक घेऊन सर्वच कामगारांना समप्रमाण कामे देण्याचे आदेश दिले. 

टाळेबंदीच्या नावाखाली दिशाभूल 

टाळेबंदीच्या नावाखाली सनफ्लॅग कंपनीद्वारे कामगारांची दिशाभूल केली जात आहे. तीन महिन्यांपासून रोजगार नसल्याने या कामगारांवर उपासमार व आर्थिक संकट ओढवले आहे. गृहखर्च, मुलांचे शिक्षण व इतर कामासाठी त्यांची फरपट सुरू आहे. या सर्व कामगारांना कामावर घ्या अन्यथा आंदोलन करून कारखाना बंद पाडण्यात येईल, असा इशारा सनफ्लॅग मजदूर सभाचे कार्याध्यक्ष विजय बांडेबुचे, महासचिव मिलिंद वासनिक, उपाध्यक्ष वीरेंद्र नेमा, अमोद डाकरे, विकास फुके, रवींद्र बोरकर तसेच भाजप सनफ्लॅग कंत्राटी कामगार संघाचे कार्याध्यक्ष मोहम्मद जावेद, उपाध्यक्ष जनार्दन मोहरे, विनोद साठवणे, सचिव मनोहर डांगर, कोषाध्यक्ष तारिक रामटेके, कार्य सदस्य विनोद दमाहे यांनी दिला आहे. 

कामगार आयुक्तांच्या आदेशाची अवहेलना 

कारखाना 50 टक्‍के कामगारांवर सुरू असला तरी नियमाप्रमाणे सर्वांनाच समप्रमाणात कामे देण्यात यावी, असे आदेश साहायक कामगार आयुक्तांनी दिले होते. परंतु, सनफ्लॅग व्यवस्थापकाने त्यांच्या आदेशाची अवहेलना करीत मोजक्‍याच कामगारांना कामावर बोलविणे सुरू ठेवले आहे तसेच वेतन कपात करून शासन निर्देशालाही हरताळ फासला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: आता तिकीट कन्फर्म होणार की नाही हे 10 तास आधीच समजणार; वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा

IPL 2026 Auction: 'खर्च कसा करणार हा...' CSK ने बोली लावलेल्या प्रशांत वीरसाठी रिंकू सिंगसह UP संघातील खेळाडूंचा बसमध्येच जल्लोष

Mumbai News: मुंबई कोस्टल रोडसाठी 9 हजार झाडे तोडणार! बीएमसीचा मोठा निर्णय; वाचा प्रकल्पाचा सविस्तर आराखडा

Expressway Toll System : आता ‘एक्स्प्रेसवे’वर टोल भरण्यासाठी गाडी थांबवून वाट पाहण्याची गरज नसणार!

Latest Marathi News Live Update :जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली

SCROLL FOR NEXT