सुनील डीवरे  Sakal
विदर्भ

सुनील डिवरे हत्या प्रकरण: चारही मारेकऱ्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी

सुनील डिवरे यांच्यावर देशीकट्ट्यातून गोळ्या झाडून आणि कु-हाडीचे घाव घालून त्यांचा निघृण हत्या करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : शिवसेना पदाधिकारी तथा यवतमाळ बाजार समितीचे संचालक सुनील डिवरे यांच्यावर देशीकट्ट्यातून गोळ्या झाडून आणि कु-हाडीचे घाव घालून त्यांचा निघृण हत्या करण्यात आली. ही गंभीर घटना येथील आर्णी मार्गावरील भांबराजा गावात गुरुवारी ३ फेब्रुवारीला सायंकाळी घडली होती. घटनेनंतर पोलिसांनी चार मारेकऱ्यांना अटक केली होती. त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने चारही मारेकऱ्यांना ८ फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. (Sunil Divare Murder Case)

वैभव प्रभाकर सोननकर (२३), पवन प्रभाकर सोननकर (२५), रोहित भोपडे (२१), सुरेश चिंगोजी पाथरीकर (५४) सर्व रा. भांबराजा अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या मारेकऱ्यांची नावे आहेत. शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षपदाच्या वादातून ३ फेब्रुवारीला सायंकाळी सात मारेकऱ्यांनी सुनील डिवरे यांच्या घरात शिरून त्यांच्यावर कु-हाडीचे घाव घातले. तसेच देशी कट्ट्यातून गोळीबार करीत ठार झाले. त्यांना वाचविण्यासाठी गेलेली पत्नी सरपंच अनुप्रिता आणि मुलगा रुद्राक्ष हे देखील या हल्ल्यात जखमी झाले होते.

घटनेनंतर पोलिसांनी अनुप्रिता डिवरे यांच्या तक्रारीवरून सात आरोपींविरुद्ध भादंवि १४३, १४७, १४८, १४९, ३०२, ३२३, ३२४, ५०६, १२० (ब), भारतीय शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्याच्या ३ (२५) आणि मुंबई पोलीस कायद्याच्या १३५ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये वैभव सोननकर, पवन सोननकर , रोहित भोपडे, रामू जयस्वाल, अमर जयस्वाल, सूरज मनवर, सुरेश पाथरीकर सर्व रा. भांबराजा आदींचा समावेश होता. घटनेच्या रात्रीच पोलिसांनी शिघ्रगतीने तपासचक्रे फिरवून संबंधित चार आरोपींना अटक केली. उर्वरित अद्यापही पसार आहेत. दरम्यान, गुरुवारी अटकेतील चारही आरोपींना यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी स्थानिक न्यायालयापुढे हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT