विदर्भ

सुपरच्या "हृदयात' टेक्‍निकल लोचा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील "ऍन्जिओप्लास्टी' विभाग गरिबांच्या हृदयावर वरदान ठरले आहे. दर दिवसाला 25च्या वर ऍन्जिओग्राफी तसेच ऍन्जिओप्लास्टी होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सुपरच्या "हृदया'वर भार वाढतो. ऍन्जिओग्राफीमधील मुख्य उपकरण असलेल्या "कॉलिमीटर'मध्ये तांत्रिक बिघाड झाला. टेक्‍निकल लोचा निर्माण झाल्यामुळे दोन दिवस हृदय विभागात दर दिवसाला एक ऍन्जिओग्राफी झाली आहे. यामुळे हृदयविकाराच्या रुग्णांना प्रतीक्षा करावी लागली. 
दर महिन्याला तीनशेपेक्षा अधिक ऍन्जिओप्लास्टी सुपरच्या हृदय विभागात होतात. त्यात दारिद्य्रयरेषेखालील रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हाच एकमेव आधार आहे. विशेष असे की, केवळ विदर्भच नाही तर मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यातील 30 टक्के लोकांचे आरोग्य सुपरच्या भरवशावर आहे. कधीकाळी बाह्यरुग्णांची संख्या 500 होती, मात्र आता दर दिवसाला दीड हजारावर पोहचली आहे. हृदयामधील ब्लॉकेजेस शोधणाऱ्या ऍन्जिओग्राफीतील कॉलिमीटर निकामी झाले. हृदयाच्या कुठल्या कप्प्यात ब्लॉकेजेस आहेत, त्याचे प्रमाण किती आहे, याचे अचूक निदान करण्यासाठी कॉलिमीटरचा मोठा वाटा असतो. यानंतरच हृदयावरील उपचाराची दिशा ठरवण्यात येते. रक्तशिरांमधील अडथळा दूर करण्यासाठी कुठे आणि किती स्टेंट टाकावे लागतील याची माहिती याच यंत्राद्वारे मिळते. यामुळे रुग्णांच्या हृदयाशी संबंधित कॅथलॅब बंद पडू नये याची विशेष काळजी सुपरचा हृदयरोग विभाग घेतो. बंद पडलेले कॉलिमीटर बदलण्यासाठी अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या आदेशानुसार तत्काळ विभागप्रमुख डॉ. मुकुंद देशपांडे यांनी तातडीने प्रस्ताव सादर केला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT