Supriya Sule attack on BJP in amravati Supriya Sule attack on BJP in amravati
विदर्भ

आणखी एक तारीख पाहू; सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला

सकाळ डिजिटल टीम

अमरावती : विधान परिषद निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल असा दावा भाजपने (BJP) काल केला होता. मात्र, भाजपच्या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी पलटवार केला. अडीच वर्षे त्यांनी खूप तारखा दिल्या आणखी एक तारीख पाहू, असा टोला सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपला लगावला. (Supriya Sule attack on BJP in amravati)

अमरावतीमध्ये (amravati) आल्या असत्या त्या पत्रकारांशी बोलत होत्या. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून सरकार पडणार असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. या गोष्टीला आज अडीच वर्षे झाली. मात्र, सत्ता काही पडलेली नाही. तरीही विरोधकांची सरकार बाबतची भविष्यवाणी काही केल्या संपलेली नाही. यावरून सुप्रिया सुळे यांनी भाजपला टोला हाणला.

देशात दडपशाहीचे सरकार सुरू आहे. जो पण या सरकारच्या विरोधात बोलतो त्याच्यावर कारवाई केली जाते. त्याच्या मागे ईडी लावून त्रास दिला जातो. हे आपण अनेक वर्षांपासून पाहत आहोत, असे सुप्रिया सुळे (Supriya Sule) काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले यावर उत्तर देताना म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशातील बेरोजगारांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. याचे मी स्वागत करते. देशातील बेरोजगार लोकांना नोकरी मिळत असेल तर त्यांचे मी स्वागत करते, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT