T-three tiger died in Tipeshwar wild sanctuary forest crime yavatmal sakal
विदर्भ

Tiger Death : टिपेश्‍वर अभयारण्यातील टी-थ्री वाघाचा मृत्यू

वनगुन्हा जारी करून पंचनामा करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

पांढरकवडा : टिपेश्‍वर अभयारण्यातील टी-थ्री वाघाचा मृत्य झाला. ही घटना गुरुवारी (ता.29) पाटणबोरी परिक्षेत्रातंर्गत वनकर्मचारी हे हंगामी मजुरांसह अर्ली वर्तुळातील भवानखोरी बिट कक्ष क्रमांक 105 मध्ये गस्त करीत असताना उघडकीस आली.

पशुवैद्यकीय अधिकारी तसेच वन अधिकार्‍यांनी मृत वाघाचे निरीक्षण केले. मृत वाघ हा नर असून, टी-थ्री (सब अ‍ॅडल्ट) असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळून आल्या नाही. तसेच वनअधिकार्‍यांनी आजूबाजूच्या परिसरात पाहणी केली.

त्यात कुठेही मनुष्याच्या पाऊलखुना आढळल्या नाही. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत वाघाचे शवविच्छेदन केले. वाघाचा मृत्यू कसा झाला, हे स्पष्ट झाले नाही. वनगुन्हा जारी करून पंचनामा करण्यात आला. शवविच्छेदनाचे आवश्यक ते सिलबंद नमूने तपासणीसाठी अमरावती येथील उपसंचालक, प्रादेशिक न्यायविभाग, वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.

वाघाचा मृत्यू नेमका कसा झाला, हे अहवालानंतर कळणार आहे. घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक किरण जगताप, सहायक वनसंरक्षक रवींद्र कोंडावार, वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश बाळापुरे, विवेक येवतकर, रमजान विराणी, डॉ. अतुल ओंकार, डॉ. अनूप काळमेघ, डॉ. अक्षय मेश्राम आदींनी घटनास्थळी धाव घेतली . पुढील तपास सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) रवींद्र कोंडावार करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

रात्री बसमध्ये झोपलेली, सीटच्या मागून कमरेत हात; सई ताम्हणकरने तोच हात पकडला आणि... स्वतः सांगितला तो प्रसंग

Agricultural Crime : रात्रीतून फळबागेतील डाळिंब लंपास चौसाळ्यातील घटना, गुन्हा नोंदविण्यासाठी वजन-किमतीचा मुद्दा ठरतोय कळीचा

Video : "यापेक्षा कार्टून बरं" जानकी-हृषीकेशमध्ये येणार दुरावा ; घरोघरी मातीच्या चुलीवर प्रेक्षक वैतागले

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

SCROLL FOR NEXT