sachin tendulkar sakal
विदर्भ

"ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प खूप चांगली जागा असल्याने पुन्हा पुन्हा येतो"

हा माझा खासगी दौरा असल्याने आम्हाला मोकळीक द्या

जितेंद्र सहारे

चिमूर (जि. चंद्रपूर) : हा माझा खासगी दौरा असल्याने आम्हाला मोकळीक द्या. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प खूप चांगली पर्यटनाची जागा असल्याने आम्ही पुन्हा पुन्हा भेट द्यायला येतो. असे सचिन तेंडुलकर मुक्काम असलेल्या रिसोर्ट मधून ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सिरकाळा बफर क्षेत्रात सफारी करिता रविवारी ४. १५ मिनिटाने घाईने निघाला असताना प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिले.

क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने ताडोबाच्या मध्ये २६ जानेवारी २०२० ला पत्नी मुलगा यांच्यासह जंगल सफारी केली. २६ जानेवारी २०२१ च्या दरम्यान आई आणी मित्रा सोबत सफारी करून ताडोबातील जैव विविधतेचे तथा जवळपास १२ वाघांचे दर्शन घेतले.यावेळेस पुन्हा शनीवारी पत्नी अंजली,बहीण आणी मित्रा सोबत पुन्हा शनीवारी ताडोबातील वाघांच्या दर्शना करिता आला. पावसाळ्याचे दिवस असल्याने कोअर क्षेत्रात जंगल सफारी बंद आहे.ज्यामुळे ताडोबाच्या मदनापूर बफर क्षेत्रात ४ .३० पासून तर ७ .३० पर्यंत जंगल सफारी केली मात्र वाघ काही दिसलाच नाही. यावेळेस त्यांचे सोबत वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी लिमये आणी गुरुप्रसाद सुद्धा होते.

सायंकाळच्या जंगल सफारी मध्ये वाघ मिळाला नाही त्यामुळे रविवारला सकाळी ७.०० वाजता ताडोबाच्या अलिझंझा बफर क्षेत्रात ११.३० वाजे पर्यंत जंगल सफारी केली याही दरम्यान वाघाचे दर्शन झाले नाही.सिरकाळा बफर क्षेत्रात वाघ असल्याने माहिती वरून सायंकाळी ४ .१५ ला रिसोर्ट वरून सफारी करिता पत्नी, बहीण ,माजी क्रिकेटर प्रशांत वैद्य आणी मित्रा सोबत सिरकाळा बफर झोन मध्ये सफारी करिता जायला निघाल्या नंतर प्रतिनिधींनी सचिन तेंडुलतर सोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरून आमचा खाजगी दौरा असल्याने आम्हाला मोकळे सोडा असे म्हणून ताडोबा ही खूप चांगली जागा असल्याने पुन्हा पुन्हा येतो असे म्हणत सफारी करिता निघून गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

SCROLL FOR NEXT