tapi project map 
विदर्भ

"तापी' योजनेचे हवाई सर्वेक्षण पूर्ण

गोपाल हरणे

अमरावती : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील तापी नदीवर प्रस्तावित महाकाय पुनर्भरण योजनेसाठी (तापी मेगा रिचार्ज प्रोजेक्‍ट) तापी खोऱ्याचे अद्ययावत तंत्रज्ञानाने हवाई सर्वेक्षण गेल्या पंधरवड्यात वॅपकॉस संस्थेमार्फत करण्यात आले. या प्रकल्पात तब्बल 8,312 एकर जमीन बुडीत क्षेत्राखाली जाणार आहे. त्यातील एकट्या धारणी तालुक्‍यातील क्षेत्र 4,275 एकर आहे. या प्रकल्पावर 5,428 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातून निघणारी ही नदी महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाते. सातपुडा पर्वतातून बाहेर पडणाऱ्या नदीनाल्यांचे पाणी धारणी ते तळोदा तसेच धारणी व अचलपूर ते इच्छापूर या भागात जमिनीत झिरपते. मात्र, मध्य प्रदेशातील नेपानगर, बऱ्हाणपूर व महाराष्ट्रातील रावेर, यावल व चोपडा तालुके या तापी खोऱ्यातील भागातील भूजलपातळी दरवर्षी 1 मीटरने खाली जात आहे. पाणीपातळी खालावण्याचा हा दर भारतात सर्वाधिक आहे. ही बाब लक्षात घेता या प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी 30 जून 2003 ला प्रथम प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. केंद्र सरकारने 2014 मध्ये टास्क फोर्सचे गठण करून महाकाय पुनर्भरणाचा प्रस्ताव सहा महिन्यांत तयार करण्याचे निर्देश दिलेले होते.
या प्रकल्पाच्या पूर्ततेच्या दृष्टीने या प्रकल्प क्षेत्राची हवाई पाहणी 10 जानेवारी 2016 रोजी केंद्रीय जलसंसाधनमंत्री उमा भारती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्र्यांनी केली होती.
वॅपकॉसला ऑक्‍टोबर 2018 अखेर प्रकल्प अहवाल सादर करावयाचा आहे. या प्रकल्पात कोणत्याही गावाचे पुनर्वसन केले जाणार नाही. एकूण 3,325 हेक्‍टरपैकी 1,710 हेक्‍टर जमीन धारणी तालुक्‍यातील; तर 1,615 हेक्‍टर जमीन मध्य प्रदेशातील आहे. त्यात 1,397 हेक्‍टर वनजमीन आहे. प्रकल्पाला प्राथमिक अवस्थेतच एकीकडे विरोध सुरू असून दुसरीकडे स्थानिक यंत्रणा मात्र या "मेगा' प्रकल्पाबाबत अनभिज्ञ आहेत.
असे राहणार पाणीवाटप
टास्क फोर्सच्या अहवालानुसार या प्रकल्पाअंतर्गत होणाऱ्या खारिया घुटीघाट जलाशयातून महाराष्ट्र व मध्य प्रदेशात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष एकूण 3 लाख 57 हजार 788 हेक्‍टरचे सिंचन होईल. ती टप्प्यात पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पातील जलसाठ्यातील महाराष्ट्राचा वाटा 19.37 अब्ज घनफूट (टीएमसी); तर मध्य प्रदेशचा वाटा 11.76 अब्ज घनफूट राहील, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

SCROLL FOR NEXT