विदर्भ

बापरे! शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात

सकाळ वृत्तसेवा

जलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.

शिक्षकेवर कारवाईची केली मागणी
विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी दिलेल्‍या तक्रारीत नमूद आहे की, त्‍यांचा मुलगा पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये शिकतो. दरम्‍या, मुलगा हा शाळेत धिंगाणा घालतो, गोंधळ करतो. त्यामुळे शिक्षिका मनिषा शेंबडे यांनी त्याला 200 उठबशा काढण्याची शिक्षा केली. त्या शिक्षेची अंमलबजावणी करताना लहान मुलगा चांगलाच भेदरून गेला. या शिक्षेचा त्याला त्रास झाल्याने तो आजारी पडला. पालकांनी जेंव्हा त्याला कारण विचारले तेंव्हा त्याने सगळी घटना सांगितली. त्यानंतर त्याच्या पालकांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, त्‍याच्‍या प्रतिलिपी जि. प. अध्यक्ष, पं.स. सभापती, शिक्षणाधिकारी, शेगाव येथील गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या शिक्षिकेविरुद्ध तातडीने कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली. मुलावर सध्या उपचार सुरू आहे. हसत-खेळत दिलेले शिक्षण हे सर्वात योग्य असते. त्यामुळेच विद्यार्थी जास्त चांगल्या पद्धतीने ग्रहण करतात असे सांगितले जाते. मात्र, असे सातत्याने सांगितले जात असतानाच हा प्रकार समोर आल्याने पालकांनाही धक्का बसला आहे. या वयात मुलांनी एकदम आदर्श राहावा असे अपेक्षीतच धरले जाऊ नये. त्यांनी धिंगाना, मस्ती करावी, खेळावे असेच अपेक्षीत आहे. मात्र, याची जाणीव या शिक्षिकेला नाही का? असा सवाल विचारला जात आहे. दरम्‍यान या संदर्भात शेगाव पंचायत समितीमधील गटशिक्षणाधिकाऱ्यांशी घटनेबाबत माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता संपर्क होवू शकला नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Criticism : 'कॉमेडियनना भेटायला वेळ, पण जरांगेंशी बोलायला नाही ’; अभिजीत दिपकेंचा सरकारवर घणाघात

Dahi Handi Govinda Death : दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून परतताना शिरोळमधील २८ वर्षीय गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शेवटचा फोटो बाळूमामांसोबतचा

Onion Payment: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सव्वा दोन कोटी कांद्याचे पैसे अडकले; शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन

मालिकेत सुखाचा संसार पण खऱ्या आयुष्यात सिंगल; दुसऱ्या लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या तेजश्रीचं वय काय?

Ujani Canal: कालवा तुडुंब, पण वीज गायब; महावितरणच्या लोडशेडिंगमुळे पेनूर परिसरातील शेतकरी संतप्त, पिके जळू लागली

SCROLL FOR NEXT