punishment 
विदर्भ

शिक्षिकेने गाठला कळस, होमवर्क केला नाही म्हणून चिमुकल्या विद्यार्थिनीला....

सकाळ वृत्तसेवा

वरोरा (जि. चंद्रपूर) : घरी करायला दिलेला होमवर्क (गृहपाठ) करून आणला नाही म्हणून केजी वनमध्ये शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थिनीला वर्गशिक्षिकेने काडीने मारहाण केली. यामुळे विद्यार्थिनीचे पाय आणि पाठीवर व्रण आले आहेत. पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी वरोरा पोलिस ठाण्यात त्या शिक्षिकेविरुद्ध तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना तालुक्‍यातील एकार्जुना येथील न्यू मॉडेल कॉन्व्हेंट स्कूल येथे घडली. 

तालुक्‍यातील एकार्जुना येथे न्यू मॉडेल कॉन्व्हेंट स्कूल आहे. गावातील पीडित छोटीशी मुलगी या शाळेत केजी वनमध्ये शिकत आहे. घटनेच्या एकदिवस आधी वर्गशिक्षिकेने विद्यार्थ्यांना होमवर्क (गृहपाठ) दिले. दुसऱ्या दिवशी शिक्षिकेने होमवर्कची तपासणी सुरू केली. यावेळी पीडित विद्यार्थिनीने होमवर्क केले नसल्याचे त्या शिक्षिकेला दिसले. त्यामुळे शिक्षिकेने तिला होमवर्कबाबत विचारणा करीत काडीने पाठीवर व पायावर मारहाण केली. या मारहाणीमुळे त्या कोवळ्या जीवाच्या पाठीवर व पायावर व्रण उमटले. 

शिक्षिकेविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

शाळा सुटल्यानंतर पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. पालकाने तातडीने शाळा गाठून शिक्षिका आणि संस्थाचालकास याबाबत विचारणा केली. मात्र, त्यांनी प्रकरणावर पांघरूण घालत उडवाउडवीची उत्तरे दिली. आपल्या मुलीसोबत घडलेला प्रकार अन्य मुलांसोबत घडू नये म्हणून पीडित मुलीच्या वडिलांनी वरोरा गाठून तेथील पोलिस ठाण्यात संबंधित शिक्षिकेविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत मारहाण करणाऱ्या शिक्षिकेविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : दादाची आस्थेने विचारणा! गावात सगळ्यांनी जेवण केलं का? ‘चानकी’ गावासाठी ‘दादा’ ठरले देवदूत

Ajit Pawar Death News LIVE Updates : अजितदादा अमर रहे... कार्यकर्त्यांच्या घोषणा

Narayangaon News : संजय काय काम आणले; असे प्रेमाने म्हणणाऱ्या दादांच्या या शब्दाला मी कायमचा मुकलो

Ajit Pawar: अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीला पोहोचल्यावर शरद पवारांनी लोकांना काय विचारलं? वाचून डोळे पाणावतील...

Ajit Pawar: नियतीचा योगायोग! ज्या घड्याळानं सत्ता मोजली, राजकारणात नाव दिलं; त्याच घड्याळानं अजितदादांची शेवटची ओळख पटवली

SCROLL FOR NEXT