amravati teachers 
विदर्भ

आम्हाला कोरोना होणार नाही का? शासनाने सुटी न दिल्याने गुरुजी संतापले

सकाळवृत्तसेवा

अमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने राज्यातील सर्व शासकीय तसेच खासगी शाळांना 31 मार्चपर्यंत सुटी जाहीर केली आहे, मात्र शिक्षकांनी शाळेत हजर राहून दैनदिन कामे करावीत, असेही आदेश दिल्याने गुरुजी मात्र संतापले आहेत. शाळेत विद्यार्थीच नसताना आम्ही कुठली कामे करावीत, असा सवाल गुरुजींनी विचारला आहे. 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत, याचाच एक भाग म्हणून शासनाने राज्यातील महापालिका, सर्व नगरपालिका व ग्रामीण भागातील सरकारी व खासगी शाळांना 31 मार्चपर्यंत सुटी जाहीर केली. मात्र शाळा बंद असल्यातरी शिक्षकांनी शाळेत हजर राहून दैनदिन कामे करावीत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षकांचे दैनंदिन काम म्हणजे अध्यापन असून शाळांमध्ये विद्यार्थीच नसतील तर कोणती कामे करावीत ?, असा प्रश्‍न शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे.

सद्य: कोरोनामुळे महानगरांमध्ये वर्क फ्रॉम होम ही संकल्पना राबविली जात असून राज्यातील काही जिल्हापरिषदांनी शिक्षकांना घरीच थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशा स्थितीत जिल्हापरिषदेनेसुद्धा "वर्क फ्रॉम होम' ही संकल्पना राबवून शिक्षकांना उर्वरित कामे घरूनच पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीसुद्दा शिक्षकांनी केली आहे. 

म्हणे अध्यापन अध्ययन करावे
या संदर्भात अमरावती पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र जारी केले असून मुख्याध्यापक तसेच शिक्षकांनी शालेय वेळेत शाळेत उपस्थित राहून आपले अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन, अभ्यासपूरक कार्यक्रम, पटसंख्या वाढ आदी नियोजनासंबंधी कामे पूर्ण करावीत, असे निर्देश दिले आहे. याशिवाय सेवाज्येष्ठता यादी, डिजीटल शाळांची माहिती ही कामेसुद्धा पूर्ण करावेत असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: ट्रम्पच्या धमकीनंतर सोन्याचे भाव कोसळले! मार्च महिन्यात सोनं तब्बल 35 हजारांनी स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

CM Devendra Fadnavis : 'भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी कोणालाही सोडणार नाही'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कडक इशारा, रूपाली चाकणकरांबाबत काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : सातारा जिल्हा परिषद निवडणूक मुद्द्यावर मंत्री शंभुराज देसाई आक्रमक

Panchang 23 March 2026: आजच्या दिवशी शिव कवच स्तोत्राचे पठण आणि ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

5 वर्षांनी स्वामींच्या भूमिकेला दिला निरोप! अक्षयची 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेतून एक्झिट, 'हे' ज्येष्ठ अभिनेते साकारणार भूमिका

SCROLL FOR NEXT