file 
विदर्भ

घटनेच्या दहा दिवसांनंतरही लिंगा भेदरलेलेच

चंद्रकांत श्रीखंडे

कळमेश्वर (जि.नागपूर) : तालुक्‍यातील लिंगा गावामध्ये पाचवर्षीय चिमुकलीवर अत्याचार व त्यानंतर खून केल्याची घटना रविवारी (ता. 8) उघडकीस आली होती. मुलीचा खून मागील शुक्रवारी (ता. 6) करण्यात आला होता. या घटनेला आज 10 दिवस पूर्ण झाले असून लिंगा गाव या प्रकरणामुळे राज्यभर चर्चेत आले.

आरोपीची तुरुंगात रवानगी; कठोर शिक्षेची मागणी कायम

गावात या प्रकरणाची सल कायम असून गावातील वातावरण आजही भेदरलेलेच आहे. पोलिसांनी आरोपी संजय देवराव पुरी यास अटक केली होती. त्याला पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत पुन्हा तीन दिवसांची वाढ मिळाली होती. आज आरोपीला नागपूरच्या विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये पाठविण्यात आले आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यावर विविध सामाजिक संघटनेने निवेदन देऊन आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी व तत्काळ फाशी द्यावी व फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा, अशी मागणी केली होती. तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने न्यायालयाने आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.


पीडितेच्या कुटुंबाला आर्थिक मदतीसाठी अनेकांनी हात पुढे केले आहेत. समाजकल्याण विभागाने 8 लाख 50 हजार रुपये मंजूर केले आहेत. 4 लाख 12 हजार 500 रुपयांचा धनादेश देण्यात आला. या धनादेशाची मासिक व्याज योजनेअंतर्गत ठेव करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा सहकारी बॅंकेचे माजी संचालक किशोर मोहोड, मुकेश परांड, असिमलाल धुर्वे, दीपक पाल, सुभाष किरपाल, रामू पाल, ऍड. राहुल मोहोड, मनोहर पाल, सुनील साव, अमोल पुरी, राहुल पाल, प्रमोद परतेकी, आरती परतेकी, शीतल पाल, आकाश किरपाल, पोलिस पाटील शंकर झाडे आदींची उपस्थिती होती. आदिवासी विभागाकडून पीडित कुटुंबाला 50 हजार रुपयांची मदत केली. सध्या लिंगा व तालुक्‍याचे ठिकाण कळमेश्वर शांत असले तरी या प्रकरणाची धग कायम आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime:पुण्यात डिलिव्हरी बॉयकडून वसतिगृहात अश्लील वर्तन; धक्कादायक प्रकार, परदेशी विद्यार्थिनींची सुरक्षा चव्हाट्यावर

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर गोळीबारचा थरार, तरूणाने स्वत:वरच गोळी झाडून घेतली

Beed News: दुष्काळी मातीत फुलला रेशमी स्वप्नांचा मळा; बीडचा पॅटर्न देशभर हिट; उत्तराखंड, झारखंड आणि कर्नाटकपर्यंत तुती रोपांचा पुरवठा

Beed News: रॉकेल तर मिळेल हो, पण स्टोव्ह आणायचा कोठून?; गृहिणींना पडला प्रश्न; पुन्हा एकदा स्टोव्ह शोधण्यासाठी महिलांच्या हालचाली झाल्या सुरू

Sadashivgad Fire: सदाशिवगडावरील वनसंपदा आगीत खाक; अंदाजे ३०० झाडे होरपळली, शिवप्रेमींनी वणव्याच्या प्रकाराबाबत निषेध!

SCROLL FOR NEXT