Demand of Buldana District Press Association.jpg 
विदर्भ

पत्रकारांची कोरोना चाचणी करा; बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाची मागणी

सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : स्वतःचा जीव धोक्यात घालून वृत्त संकलनाचे काम करणाऱ्या मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांची कोरोना चाचणी करण्यात यावी, तसेच त्यांना पन्नास लाखांचे विमा कवच देण्यात यावे अशी मागणी बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. या मागणीचे निवेदन मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र काळे व बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण जैन यांनी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे यांच्याकडे दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना या भयंकर महामारी संकटाच्या काळामध्ये सर्वच यंत्रणा आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. आरोग्य विभाग, पोलिस यंत्रणा, महसूल यंत्रणा, ग्राम पातळीवरील सर्व अधिकारी सर्वजण जोमाने काम करून हे संकट दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे सर्वजण कसे काम करतात हे आपल्या माध्यमांच्या माध्यमातून जनतेसमोर मांडून कर्मचारी व अधिकाऱ्यांचा उत्साह द्विगुणित करण्याचे काम प्रसार माध्यमे करीत आहेत.

यामध्ये प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया व सोशल मीडिया सर्वांचाच सहभाग आहे. अनेक वृत्तपत्र इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार आपला जीव धोक्यात घालून वृत्त संकलनासाठी अधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून व्यस्त आहेत. नुकतेच मुंबईत झालेल्या चाचण्यांमध्ये 50 पेक्षा अधिक पत्रकारांना, छायाचित्रकारांना कोरोना लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. 

या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने मुंबई व नागपूर मध्ये पत्रकारांची कोरोना चाचणी करण्यात आली, शिवाय इतर शासकीय कर्मचाऱ्यांनी प्रमाणे पत्रकारांना देखील पन्नास लक्ष रुपयांचे विमा कवच देण्यात आले. त्याचप्रमाणे बुलडाणा जिल्ह्यातील पत्रकारांची सुद्धा कोरोना चाचणी करावी व या संकटसमयी शासनाने पाठीशी उभे राहून पत्रकारांना पन्नास लाख रुपयांचे विमा कवच देण्यात यावे, अशी आग्रही मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण झालं, पण कोणाला मिळाला संघातून डच्चू? पाहा भारत-इंग्लंडची Playing XI

Women Farmers Lead: भिवधानोरा गावातील शेतकरी महिलांची जलसंधारण, सेंद्रिय शेती व सामूहिक खरेदीत आदर्श कामगिरी; पाणी फाउंडेशन स्पर्धेत उठून दिसले योगदान

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

School Flooding: पहिल्याच पावसात अगरकानडगाव जि.प. शाळा जलमय; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात, कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी शिरसाट यांची पाहणी

Mumbai Rain: पावसाने उघड केलं विकासाचं वास्तव! मुंबईत झाडं कोसळली, रस्ते वाहून गेले, मिसिंग लिंकवर खड्ड्यांचं साम्राज्य

SCROLL FOR NEXT