Testimony of both including the treating doctor Hinganghat arson case 
विदर्भ

हिंगणघाट जळीतकांड प्रकरण : सुनावणी संपली पहिल्या सत्रातच; उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांसह दोघांची साक्ष

रूपेश खैरी

हिंगणघाट (जि. वर्धा) : अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणात मंगळवारी (ता. १६) तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरसह अन्य दोघांची साक्ष नोंदविण्यात आली. बचाव पक्षाच्या वतीने त्यांची उलटतपासणीही करण्यात आली. त्यांनी या साक्षीदारांना विशेष विचारणा केली नसल्याने आजचे कामकाज दुपारच्याच सत्रात आटोपले.

अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणाचे कामकाज येथील न्यायालयात सकाळी ११ वाजता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. माजगावकर यांच्या समोर सुरू झाले. सरकारी पक्षातर्फे अंकितावर नागपूर येथे उपचार करणारे डॉ. निनाद गावंडे यांची साक्ष नोंदविण्यात आली. सोबतच अंकिताची सहप्राध्यापिका मोनिका माऊस्कर आणि या घटनेची माहिती प्रथम मातोश्री कुणावार महाविद्यालयात देणारी विद्यार्थिनी वैष्णवी चंदनखेडे हिची साक्ष नोंदविण्यात आली.

तिघांचीही बचाव पक्षाच्या वकिलांनी उलटतपासणी केली. यावेळी त्यांनी विशेष विचारणा केली नसल्याने आजची सुनावणी पहिल्या सत्रातच संपली. सरकारी पक्षातर्फे या प्रकरणात झालेल्या तीन साक्षीदार शिवाय मागील तारखांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सागर गायकवाड तसेच अभय तळवेकर, मृत अंकिताचे वडील अरुण नागोराव पिसुड्डे, आई संगीता, शव परीक्षण पंचनाम्याच्या पंच साक्षीदार नागपूरच्या श्रीमती देशमुख, मातोश्री कॉलेजचे प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर, घटनास्थळावरील पंच सचिन बुटले अशा एकूण आठ जणांची साक्ष नोंदविण्यात आलेली आहे.

शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्‍टरांची साक्ष

खटल्यात सरकारी पक्षातर्फे बुधवारी (ता. १७) अंकिताचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्‍टरांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे. या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने एकूण ७७ साक्षीदार आहेत. सरकारी पक्षातर्फे प्रसिद्ध विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी भाग घेतला. त्यांना सरकारी वकील ॲड. वैद्य यांनी सहकार्य केले; तर बचाव पक्षातर्फे भूपेंद्र सोने यांनी भाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT