विदर्भ

अमरावतीच्या एकलविहीरच्या जंगलात सापडले दोघांचे मृतदेह

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : वरुड तालुक्यातील व शेंदुरजनाघाट पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एकलविहीर गावालगतच्या जंगलातून इंधन गोळा करून घरी आणण्यासाठी गेलेल्या दोघांचे मृतदेह लागोपाठ रविवार आणि सोमवारी आढळून (The bodies of both were found) आले. बाबुराम मनिराम आहाके (वय ५५) आणि शामराव कुसराम (वय ६०) अशी मृतांची नावे आहे. हे दोघेही एकलविहीर येथील रहिवासी आहेत. (The bodies of the two were found in the forest of Amravati)

तेंदूपत्ता गोळा करणाऱ्यांना हे मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. शेंदुरजनाघाट पोलिस व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहांचे पंचनामे केले. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांनंतर आदिवासी बांधव जंगलात जाण्यासाठी घाबरत असल्याचे बोलले जात आहे.

आहाके डिसेंबर महिन्यात तर कुसराम चार दिवसांआधी बेपत्ता झाले होते. बापूराव आहाके हे मागील डिसेंबर महिन्यापासून घरून निघून गेल्याची तक्रार शेंदुरजनाघाट पोलिसांत त्यांच्या नातेवाइकांनी दिली होती. मात्र, त्यांचा पत्ता लागलेला नाही. पोलिस व वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी संयुक्त पंचनामा करून त्या मृतदेहाचे जोगवरच शवविच्छेदन केले. ही घटना ताजी असतानाच मागील चार दिवसांपासून पुन्हा याच जंगलात बेपत्ता झालेला शामराव कुसराम याचा मृतदेह सोमवारी सकाळी एकलविहीरच्या जंगलात आढळून आला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

(The bodies of the two were found in the forest of Amravati)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Latest Marathi News Live Update : कर्नाटकात दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

SCROLL FOR NEXT