विदर्भ

वर्धेत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी; कोरोनावर केली होती मात

सकाळ वृत्तसेवा

आष्टी (शहीद) (जि. वर्धा) : कोरोनाच्या (coronavirus) मृत्यूचा आकडा कमी होण्याचे संकेत नसताना वर्ध्यात म्युकरमायकोसिसने (Mucormycosis) पहिला बळी घेतला आहे. या आजाराने पेठअहमदपूर येथील शंकर व्यंकटराव ढबाले (वय ६६) यांचा मृत्यू झाला. (The first victim of Mucormycosis in Wardha)

शंकर ढबाले यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या मुलाने ताबडतोब अमरावती येथे उपचारासाठी नेले होते. आठ दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यामधून दुरुस्त झाल्यावर घरी आणण्यात आले. मात्र पाच दिवसांत त्यांना म्युकरमायकोसिस या दुर्धर आजाराने ग्रासले. त्यांच्या नाकामध्ये मोठ्या प्रमाणात काळी बुरशी तयार झाली होती. ती बुरशी झपाट्याने वाढत डोळा, घसा व कानात पोहोचली. त्यांचा डोळा बंद पडला.

घशाचा व कानाचा भाग पूर्ण खराब झाला. त्यांना तातडीने पुन्हा अमरावतीला नेण्यात आले. मात्र, डॉक्‍टरांनी त्यांच्यावर उपचार करणे शक्‍य नाही. असे सांगत घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. घरी आणताच दोनच दिवसात त्यांचा मृत्यू झाला. शंकरराव यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. शेतीवर ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.

अशातच त्यांना कोरोणाने ग्रासले. त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यांना पांढऱ्या पेशी कमी झाल्याने निमोनियासुद्धा झाला होता. त्यांच्या दोन्ही मुलांनी उपचारासाठी अमरावती येथे नेले होते. उसनवारीने पैसे आणून खासगी हॉस्पिटलमध्ये अडीच लाख रुपये खर्च करून त्यांच्यावर आठ दिवस उपचार केले. यामधून शंकरराव ठणठणीत झाले होते.

शक्‍यता नसल्याचे म्हणत डॉक्‍टरांनी पाठविले परत

कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना पेठअहमदपूर या गावी आणण्यात आले. घरी पाच दिवस त्यांची प्रकृती चांगली राहिली. मात्र, लगेच त्यांचा डोळा लाल झाला व बंद पडला. डॉक्‍टरांना दाखवले असता त्यांच्या नाकामध्ये काळी बुरशी प्रचंड प्रमाणात तयार झाली असून, बुरशीमुळे झपाट्याने डोळा, घसा व कानाचे अवयव खराब केले. लागलीच त्यांना अमरावती येथे इरविन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. कान, नाक, घसा तज्ज्ञांनी तपासणी केली. तपासणीअंती डॉक्‍टरांनी ‘शंकरराव वाचणार नाही, त्यांना घरी घेऊन जा’ असा सल्ला दिला.

(The first victim of Mucormycosis in Wardha)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT