अमरावती : ज्या कोरोना रुग्णांना (coronavirus) मधुमेह आहे व त्यांचा मधुमेह नियंत्रित नाही त्यांच्यामध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे लक्षण आढळून येत आहे. या आजारात नाकाजवळ, ओठाजवळ काळसर ठिपका आढळून येतो. वेळेत उपचार झाले नसल्यास डोळे, श्वसन व मेंदूवर विपरीत परिणाम होऊ शकतो. या आजाराचे लवकर निदान होणे गरजेचे असते. या आजारामुळे कोरोना रुग्णांनी घाबरून न जाता मधुमेह (Diabetes) असणाऱ्यांनी तो नियंत्रित ठेवावा. त्यासाठी व्यायाम, योग्य आहार व डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार (Medication) करण्याची सूचना आरोग्य विभागाने केली आहे. (The Guardian reviewed the Corona situation)
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुले बाधित होण्याची शक्यता गृहीत धरून लहान मुलांसाठी तसेच अलीकडच्या काळात म्युकरमायकोसिसचे रुग्णही आढळत असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी काल दिले. जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बालरोगतज्ज्ञ व ईएनटी तज्ज्ञांच्या सहभागासह आरोग्य यंत्रणेची ऑनलाइन बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, बालरोगतज्ज्ञ डॉ. सुमित लहाने, डॉ. महल्ले, डॉ. पाचबुद्धे यांच्यासह अनेक बालरोगतज्ज्ञ व ईएनटी तज्ज्ञ या ऑनलाइन बैठकीत सहभागी झाले होते.
नव्याने येणाऱ्या अडचणींवर आपण वेळीच मात करणे आवश्यक आहे. लहान मुलांना तिसऱ्या टप्प्यात अधिक धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ते लक्षात घेऊन आवश्यक उपचार सुविधा उभारणे आवश्यक आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी सर्व उपचार सुविधांची सुसज्ज असा स्वतंत्र वॉर्ड उभारण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
लहान मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील फेज-वन इमारतीत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, लहान मुलांमधील उपचाराबाबत मार्गदर्शन, प्रतिबंधात्मक औषधे, आवश्यक साधनसामग्री व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याबाबत तत्काळ हालचाली करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. याशिवाय म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड उभारण्याचा निर्णय झाला.
जागृतीबाबत मोहीम हाती घेण्याचे निर्देश
म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोफत उपचार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या आजारावरील औषध महागडे आहे. त्यामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी असलेल्या एक हजार रुग्णालयांमध्ये या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत. या आजाराच्या जागृतीबाबत मोहीम हाती घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
(The Guardian reviewed the Corona situation)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.