विदर्भ

मुलांच्या तोंडी एकच प्रश्न कोरोना केव्हा संपेल?

नीलेश डाखोरे

नागपूर : कोरोना (coronavirus) आता कुणासाठीही नवीन नाही. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांवर याचा परिणाम झाला आहे. बरे-वाईट सगळ्यांचा अनुभव आलेला आहे. कोरोनाने अनेकांच्या आयुष्यात अंधार केला असला तरी कोण आपला आणि कोण फक्त नावासाठी आपल्यासोबत होता याची देखील ओळख पटवून दिली आहे. हे सर्व होत असले तरी याचा सर्वाधिक फटका लहान मुलांना (Small child) बसला आहे. शाळा बुडाली, अभ्यास करता आला नाही आणि ऑनलाइन शाळेच्या (Online school) नावावर चांगलीच लूटमार झाली. दुसरीकडे घरात चांगलेच बंदिस्त राहावे लागले. त्यामुळेच की काय मुलं आता ‘आई-बाबा, कोरोना केव्हा संपेल’ असे प्रश्न विचारू लागले आहेत. (The only question in the children's mouths is when will the corona end?)

लहान मुलांच्या जीवनात खेळ आणि मित्र यांना खूप महत्त्वाचे स्नान आहे. खेळामुळे मुलांचे आरोग्य व मन निरोगी राहते. बालकांना नैतिक धडे मित्रांकडून मिळत असतात. खेळ व मित्र हे बालकांच्या जीवनातील अविभाज्य घटक आहेत. परंतु, मागीलवर्षी देशात कोरोनाचा शिरकाव झाला आणि मुलं घरात बंदिस्त झाले. पालकांना मुलांच्या आरोग्याची काळजी वाटत असल्याने त्यांनी शाळेतही पाठवणे बंद केले.

शाळा बंद झाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद होता. मात्र, हाच आनंद त्यांच्यासाठी दुःख घेऊन आला. देशात कोरोनाचा प्रकोप वाढत गेल्याने सरकारने लॉकडाऊन घोषित केले. यामुळे नागरिकांना घराबाहेर निघणे देखील कठीण झाले. यामुळेच पालकांनी आपल्या पाल्यांना घरातून बाहेर निघण्यास मनाई केली. यामुळे मुलं घरातच बंदिस्त झाले. सुरुवातीचे काही दिवस काढल्यानंतर मुलंही बोर होऊ लागले.

यानंतर देशात कोरोनाची दुसरी लाट आली. यातही मोठे नुकसान झाले. आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याचा सर्वाधिक फटका मुलांना बसणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे जवळजवळ दीड वर्षांपासून घरात बंदिस्त झालेले लहान मुलं ‘आई-बाबा कोरोना केव्हा संपेल’ असा प्रश्न विचारू लागले आहेत.

पहिल्या लॉकडाऊनपासून मुले घरातच आहेत. शाळा नाही, अभ्यास नाही, मित्र नाहीत आणि खेळही नाहीत. त्यामुळे मुलांची घरकोंडी झाली आहे. पहिल्या टाळेबंदीत मुलांना थोडीफार खेळायची मुभा तरी होती. मात्र, दुसऱ्या लाटेत बाधितांच्या मृतांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे ग्रामीण भाग व शहरे धास्तावून गेली आहेत. त्यामुळे लहान मुले घरातच बंदिस्त झाली व खेळण्यावर बंदी आली आहे. कोरोना केव्हा जातो व मित्रांसोबत केव्हा खेळायला मिळेल, याची मुलं वाट पाहत आहेत.

आम्हाला खेळायला जाऊ दे व

लहानपणाच्या खेळाचा जो आनंद आहे, तो पैशाने विकत घेत येत नाही. मात्र, कोरोनामुळे मुलं खेळापासून वंचित राहत आहे. कोरोनाने खेळ बंद झाला आहे. बाहेर फिरणे तर दूरचीच गोष्ट झाली आहे. आप्तस्वकीयांकडे जाणे बंद, शेजारच्या घरी खेळायला जाणे बंद झाल्यामुळे मुलं कंटाळून गेली आहेत. आता त्यांना घरात राहणे कठीण झाले आहे. यामुळे ते आम्हाला खेळायला जाऊ दे व असे म्हणत आहे. तसेच घरातल्या घरात राहून मुले एकलकोंडी, हताश व चिडचिडी होत चालली आहे.

पालकांनाच व्हावे लागेल शिक्षक, मित्र, मार्गदर्शक

कोरोनाच्या काळात मुलांची शाळा, खेळ व मित्र दुरावले आहेत. म्हणून पालकांना त्यांचे पालकत्व जपून शिक्षक, मित्र, मार्गदर्शक अशा विविध भूमिका साकाराव्या लागणार आहेत. मुलांच्या मानसिक जडणघडणीत पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. आता बहुतांशी मुले टीव्हीसमोर असतात. मोबाईलवर खेळतात. दररोजच्या या गोष्टींमुळे त्यांच्या मानसिकेतवर विपरीत परिणाम होत आहे. टीव्ही आणि मोबाईल तेच ते दररोज पाहून मुले कंटाळून गेली आहेत.

(The only question in the children's mouths is when will the corona end?)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT