Theft looted 40 lacs from ward member house in Amravati  
विदर्भ

नगरसेवकांकडे 40 लाखांची घरफोडी; सोन्याच्या दागिन्यांसह रोकडही लंपास

प्रतीक मालवीय

धारणी (जि. अमरावती) ः शहरातील वॉर्ड क्रमांक बारामधील नगरसेवकाच्या निवासस्थानी धाडसी घरफोडी झाली. चोरट्यांनी सोन्याचांदीच्या मौल्यवान दागिन्यांसह लाखोंची रोख रक्कम, असा अंदाजे 35 ते 40 लाखांचा ऐवज लंपास केला. सोमवारी (ता. 18) सकाळी ही घटना उघडकीस आली.

धारणी ठाण्याच्या हद्दीत आतापर्यंत झालेली ही सर्वांत मोठी घरफोडी असल्याची माहिती पुढे आली. येथील आसिफ सौदागर यांच्या लहान भावाच्या मुलीचा साखरपुडा अचलपूर येथे रविवारी (ता. 17) होता. त्यामुळे घर बंद करून ते कुटुंबासह धारणीवरून अचलपूर येथे गेले होते. 

सोमवारी (ता. 18) ते कुटुंबासह धारणीला पोहोचले असता, घरफोडी झाल्याचे निदर्शनात आले. चोरट्यांनी घरातील आलमारी, कपाटातील सामग्री अस्ताव्यस्त करून चांगलाच धुमाकूळ घातला होता. धाडसी घरफोडीच्या घटनेनंतर धारणीचे प्रभारी पोलिस निरीक्षक आयपीएस निकेतन कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय काळे, सहायक पोलिस निरीक्षक श्री. ठाकूर, अनिल झारेकर, अनुराग पाल, अरविंद सरोदे यांसह मोठा ताफा घटनास्थळी जमला होता. श्‍वानपथक, ठसेतज्ज्ञांना घरफोडीच्या ठिकाणी पाचारण करण्यात आले. गुन्हेशाखेचे पथकही घटनास्थळी पोहोचले.

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

धारणीच्या इतिहासातील आतापर्यंतची ही सर्वांत मोठी घरफोडी असल्याने पोलिसांनी या मार्गावरील जेथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, त्याचे फुटेज तपासणीचे काम सुरू केले. त्यातून काही महत्त्वाचा सुगावा मिळण्याची शक्‍यता पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

Social Media Ban : मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात? 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी; किशोरवयीनांसाठीही कडक नियम, EU Kids Act मध्ये काय आहे?

Latest Marathi News Update : वाघूळखेडा शिवारात शेतात काम करणाऱ्या मजुरांवर कोसळली वीज; दुर्घटनेत तीन महिलांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT