file photo 
विदर्भ

हा जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर; 32 दिवसांत 327 जणांचा चाचणी अहवाल नकारात्मक

सकाळ वृत्तसेवा

गोंदिया : आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण 336 व्यक्तींच्या घशातील स्रावाचे नमुने कोरोना चाचणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी 328 व्यक्तींच्या नमुन्यांचा चाचणी अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये 327 नमुन्यांचा चाचणी अहवाल नकारात्मक आला; तर 1 नमुना यापूर्वीच सकारात्मक आला आहे.

मंगळवारी 32 दिवसांच्या कालावधीत एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे गोंदिया जिल्हा ग्रीन झोनमध्ये आला असून लवकरच कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहे.

संशयितांचे नमुने तपासणीसाठी

जिल्ह्यात बाहेरजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची सावधगिरीचा उपाय म्हणून आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. काही व्यक्ती घरी तर काही व्यक्तींना शासकीय संस्थात्मक अलगीकरण तर काहींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. कोरोना संशयित व्यक्तींच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी नियमित नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत.

8 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित

आठ व्यक्तींच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी मंगळवारी (ता. 12) नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. एकूण 8 नमुन्यांचा चाचणी अहवाल प्रलंबित आहे. जिल्ह्यात एक रुग्ण 26 मार्चला कोरोना बाधित आढळून आला होता, त्या रुग्णावर उपचार करण्यात आले. त्याचा चाचणी अहवाल 10 एप्रिल रोजी नकारात्मक आल्यामुळे तो बरा झाल्याने त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

जिल्ह्यात 63 व्यक्ती उपचार सुरू

सहा शासकीय संस्थात्मक अलगीकरण केंद्रात जिल्ह्यात 63 व्यक्ती उपचार घेत आहेत. नवीन जिल्हा क्रीडा संकुल येथील कोविड केअर सेंटरमधील विलगीकरण कक्षात 60 व्यक्ती उपचार घेत आहेत.
शासकीय संस्थात्मक अलगीकरण केंद्र असलेल्या एम. एस. आयुर्वेदिक कॉलेज, कुडवा गोंदिया- 17, चांदोरी- 5, लिटिल बर्ड कॉन्व्हेंट, नगर परिषद तिरोडा- 4, उपकेंद्र बिरसी- 7, समाजकल्याण निवासी शाळा, डव्वा- 2 आणि शासकीय आश्रमशाळा, इळदा - 28 अशी एकूण 63 व्यक्ती उपचार घेत आहेत. विलगीकरण केंद्रातील 60 आणि संस्थात्मक अलगीकरण केंद्रातील 63 असे एकूण 123 जण उपचार घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT