corona 
विदर्भ

हा जिल्हा अजूनही कोरोनामुक्त 105 रुग्णांचे नमुने निगेटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

भंडारा : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण नसला तरी जिल्हा प्रशासन डोळ्यात तेल घालून काम करीत आहे. आतापर्यंत 118 व्यक्तींच्या घशाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 105 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आलेले आहेत. लगतच्या नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याने जिल्हा सीमेवर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे लक्षात येताच केंद्रशासनाने 21 दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला. आज, मंगळवारी लॉकडाउनची संपुष्टात येणार होती. परंतु, केंद्र सरकारने देशात 3 मे पर्यंत लॉकडाउन वाढविला आहे. शीघ्र प्रतिसाद पथकाद्वारे भेट देऊन तपासणी केल्याने आजवर जिल्ह्यात 19, 972 व्यक्ती पुणे, मुंबई व इतर राज्यातून आल्याचे समोर आले आहे. त्यापैकी 2,945 व्यक्तींनी होमक्वारंटाइनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केला. तर 17, 027 व्यक्तींना होमक्वारंटाइन करण्यात आले. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभावी उपाययोजना केल्या असून ज्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा स्टॅम्प लावण्यात आला आहे.
आतापर्यंत 62 व्यक्तींना हॉस्पिटल क्वारंटाईनमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 14 एप्रिलपर्यंत 118 व्यक्तींचे घशातील नमुने इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय (मेयो) नागपूर येथे पाठविण्यात आले होते. यातील 105 व्यक्तींचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर, 13 व्यक्तींचे नमुने अप्राप्त आहेत. सध्या 12 व्यक्ती अलगीकरण कक्षात भरती आहेत. तर, 30 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये आजपर्यंत एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. तरीसुद्धा शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.
भंडारा जिल्ह्यामधील 9 शासकीय वसतिगृहामध्ये विस्थापित तसेच मजूर यांच्यासाठी निवारागृह करण्यात आले आहे. येथे आलेल्या कामगार व मजूर व्यक्तींची तपासणी तज्ञ डॉक्‍टरांमार्फत करण्यात येते आहे. या ठिकाणी भोजन, वैद्यकीय तपासणी, योगा व समुपदेशनाची व्यवस्था आहे. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनचा कालावधी 30 एप्रिलपर्यंत वाढविला असून जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार संचारबंदी व लॉकडाउनची कडक अंमलबजावणी सुरू आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करून दंड वसूल केला जात आहे. तसेच मास्क वापरण्याची सक्ती केली जात आहे.

सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्र येथे फ्ल्यू ओपीडी सुरू करण्यात आली. तसेच आतापर्यंत "सारी'च्या तपासणीसाठी 13 व्यक्तींना भरती करुन त्यांचेही नमुने नागपूर मेयो येथे पाठविले होते. ते सर्व नमुने निगेटीव्ह आले आहेत. गावपातळीवर आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत सर्वेक्षण सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT