गोंदिया : शहरातील कुंभारेनगरात जमा झालेला गारांचा खच.  
विदर्भ

या जिल्ह्यांना गारपिटीने झोडपले; पावसाचीही हजेरी

सकाळ वृत्तसेवा

गोंदिया/भंडारा  :  हवामान  खात्याने  23  ते  25 फेब्रुवारीपर्यंत  तुरळक  पावसाची  शक्‍यता  वर्तविली  होती. रविवारी  (ता.23)  दिवसभर  ऊन  तापत  होते.  आज, सोमवारी  पाऊस  पडेल,  असे  कोणतेही  चिन्ह  नव्हते.  मात्र,  सा यंकाळी  पावणे सहाच्या  सुमारास  हलकासा  वारा सुरू  झाला.

साडेसहाच्या  सुमारास  गारपिटीसह  मुसळधार  पावसाने गोंदिया  आणि  भंडारा  जिल्ह्यात  जोरदार  हजेरी  लावली. केवळ  अर्धा तास  पडलेल्या  या  पावसाने  अनेकांची  भंबेरी उडाली.

विद्युत  पुरवठा  खंडित

विजेचा  कडकडाट,  मुसळधार  पा ऊस  आणि  मध्येच होणारी  गारपीट  यामुळे  रस्त्यावर  शुकशुकाट  होता. कामानिमित्त  बाहेर  पडलेल्या  नागरिकांना  कुठे  दुकानांचा,  तर  कुठे  एखाद्या  आडोशाचा  आसरा  घ्यावा लागला. 

पानटपरीवरचे  छत  कोसळले

जोरदार  हवेमुळे  पानटपरीवरचे  छत  कोसळले. बहुतांश  ठिकाणी  झाडे  पडली.  विद्युत  तारा  तुटल्या. त्यामुळे  ग्रामीण  भागासह  शहरी  भागांतदेखील  विद्युत पुरवठा  खंडित  झाला  होता.  गोंदिया  येथील रेल्वेस्थानकाच्या  ओव्हरब्रीजवरील  पत्रे  कोसळली.

भाजीपालावर्गीय  पिकांचे  नुकसान

भंडारा  जिल्ह्यातील  साकोली  येथे  पावसासोबत  बारीक गारा  पडल्या.  पांढराबोडी,  हत्तीडोई  व  तुमसर  तालुक्‍यात माडगी  येथेही  छोट्या  आकाराची  गार  पडली.  साकोली  येथे  कापडाच्या  दुकानासमोरील  मंडप  कोसळल्याने  एक दुचाकी  व  सायकलचे  नुकसान  झाले. 

टाकळी  येथे परमात्मा  हॉटेलचे  छत  जोरदार  वाऱ्यामुळे  कोसळले. सुदैवाने  यात  कोणालाही  इजा  झाली  नाही.  या  पावसामुळे शेतातील  भाजीपाला वर्गीय  पिकांचे  नुकसान  झाल्याने शेतकरी  आणखीच  अडचणीत  सापडला  आहे.  तसेच वातावरणात  पुन्हा  गारवा  निर्माण  झाला  आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US Proposal: इराणची मोठी हालचाल! अमेरिकेला नवा १४ कलमी अणुकराराचा प्रस्ताव पाठवला, कोणत्या अटी ठेवल्या?

बीसीसीआयला RTI कायद्यातून वगळले! CIC चा महत्त्वाचा निर्णय; कारण काय दिले ते वाचा...

ट्रकचा अक्षरशः चेंदामेंदा! १०० वऱ्हाड्यांना घेऊन जाणारा ट्रक पलटी, १२ जणांचा मृत्यू, घटनास्थळावरील थरारक व्हिडिओ समोर

Iran War Preparation : इराण झुकण्यास तयार नाही! ट्रम्प यांच्या धमकीनंतर इस्लामी सरकारचा मोठा निर्णय? लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्याच हाती दिली AK-47

Latest Marathi News Live Update : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यचा जामीन फेटाळला

SCROLL FOR NEXT