money 
विदर्भ

एक लाखाचे तीन लाख रुपये देण्याचे दिले आमीष आणि केली एकाची फसवणूक....

राजेश भितकर

मारेगाव (जि. यवतमाळ) : एक लाख रुपयांच्या बदल्यात तीन लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचा प्रयत्न एका टोळक्‍याने केला. मात्र, दोन हजार रुपयांच्या बनावट नोटांचे बंडल देण्याचा बेत संशय आल्याने फसला. टोळके एक लाख रुपये घेऊन पसार झाले. पोलिसांत तक्रार दिल्यावर पाच संशयितांना अटक करण्यात आली. ही घटना शनिवारी (ता.11) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. 

मारेगाव येथील फसवणुकीच्या कारनाम्यात अग्रेसर असलेला व्यक्ती व त्याच्या साथीदाराने चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील कर्जबाजारी व्यक्तीला एक लाख रुपयांचे तीन लाख रुपये देतो, असे आमिष फोनद्वारे दिले. ठरल्याप्रमाणे भद्रावती येथे एकास पाठवून मारेगाव शहर महामार्गावरील घटनास्थळावर महेंद्र तिवारी याच्यासोबत मामेभाऊ असे दोघे आले. टोळक्‍यांनी एक लाख रुपये मागितले असता, यावर आधी तीन लाख रुपये द्या, असे म्हटल्यावर दोन हजार रुपयांच्या नोटांचे बंडल दाखविले. ते बनावट असल्याचे लक्षात आल्याने टोळक्‍यांची लढवलेली शक्कल फसली. एक लाख रुपये आमच्याकडे दे नाहीतर जीवानिशी मारून टाकेल, अशी धमकी देत एक लाख रुपये घेऊन टोळक्‍यांनी घटनास्थळावरून पोबारा केला. 

या प्रकरणी महेंद्र ईश्‍वरलाल तिवारी, महेंद्र ईश्वरलाल तिवारी (रा. भद्रावती) याने मारेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून तपास करून पोलिसांनी संशयित राजू भुजाडे, अरविंद चौघुले, अविनाश जांभूळकर, मारोती पवार, लीलाधर मुरस्कार यांना अटक केली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक जगदीश मंडलवार, पोलिस उपनिरीक्षक अमोल चौधरी, सुरेंद्र टोंगे, अजय वाभीटकर, नितीन खांदवे, किशोर आडे, प्रिया निब्रड, विना गेडाम यांनी केली.  

संपादन ः राजेंद्र मारोटकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT