bhakari 
विदर्भ

मोहफुलाशी भाकरी खाऊन ढकलताहेत ते एकेक दिवस

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : लॉकडाऊनमध्ये सुखवस्तू कुटुंबातील सदस्य आपापले छंद जोपासत असताना गरिबांना जगण्यासाठी मरणाची जोखीम पत्करावी लागत आहे. काम बंद आहे. घरात एक छदाम नाही. भाजीपाला घ्यायचा कसा? घरी लहान मुलं आहेत. ते कोरडी भाकर खाऊ शकत नाहीत. निदान वरणाला चव यावी म्हणून मोहफुले तूरडाळीत टाकून शिजवायची आणि जिभेला चव आणायची. यासाठी गरीब वस्तीतील शेकडो मजूर जीव मुठीत घेऊन मोहफुल वेचायला जात असल्याचे विदारक चित्र जुनोना जंगलात बघायला मिळत आहे.
शहरातील बाबूपेठ, आंबेडकरनगर या वस्त्यांमध्ये मजूर वर्ग राहतो. बिहार, उत्तर प्रदेशातून येथे कामासाठी आलेले हे मजूर आहेत.  त्यांच्याकडे रेशनकार्ड नाही. मतदारयादीत त्यांचे नाव नाही. त्यामुळे त्यांच्याकडे फारसे कुणी लक्ष देत नाही. काही नगरसेवकांनी त्यांना अन्नधान्य उपलब्ध करून दिले. परंतु काम बंद आहे. त्यामुळे हातात पैसा नाही. उधार देणारे कुणी नाही. त्यात घरभाड्याचे ओझे आहे. त्यामुळे भाजीपाला आणि स्वयंपाकासाठी लागणारे इतर साहित्य ते घेऊ शकत नाहीत. घरी लहान मुलं. ते कोरडी भाकर किती दिवस खाणार. निदान वरणाला तरी चव यावी म्हणून त्यात मोहफुल उकळून टाकण्याचा उपाय त्यांनी शोधला आहे. या परिसरात मजुरांची संख्या मोठी आहे. त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. बहुतांश मजुरांनी आता मोहफुलाच्या भाकरीचा पर्याय निवडला आहे, असे नगरसेवक अनिल रामटेके यांनी सांगितले.
महेश निसाद या मजुराची जुनोनाच्या जंगलात भेट झाली. तो मूळचा उत्तर प्रदेशातील इलाहाबादचा. नऊ महिन्यांपूर्वी कामाच्या शोधात आला आणि इथेच स्थायिक झाला. बांधकामावर तो मजूर म्हणून जातो. पत्नी आणि दहा वर्षांचा मुलगा असे त्याचे कुटुंब आहे. बाराशे रुपये भाड्याच्या खोलीत हे तिघेही बाबूपेठ परिसरात वास्तव्याला आहेत. सध्या मोहफुल वेचताना बिबट्याच्या हल्लात ठार होण्याच्या घटना वाढल्या आहे. त्याही परिस्थितीत महेश आणि त्याचा दहा वर्षांचा मुलगा जंगलात मोहफुल वेचताना दिसले. दारूबंदी असल्यामुळे मोहफुलाची दारू गाळणे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे महेशही त्यासाठीच मोहफुल वेचत असेल, असा समज झाला. मात्र, त्याने मोहफुल वेचण्याचे कारण सांगितले आणि लॉकडाऊनमधील मजुरांच्या विदारक स्थितीचे प्रातिनिधिक उदाहरण समोर आले.

सविस्तर वाचा - प्रेयसी दुस-याबरोबर सेट झाल्याने टिकटाँवर टाकले दर्दभरे व्हिडिओ अन्                                                         वरणाला चव यावी म्हणून ...                                                               त्यांच्या वस्तीतील अनेक मजूर सकाळी मोहफुले वेचायला येतात. कारण भाजीपाला घेऊ शकत नाही. अनेकांकडील अन्नधान्य संपले आहे. मदतीला कुणी नाही. घरी जाऊन वेचलेल्या मोहफुलांना पाण्याने धुऊन ते खायचे. ते ही खाणे नाही झाले तर ते उकळायचे. तेही नाही झाले तर थोड्याशा डाळीत ते शिजवायचे आणि कुटुंबाला खाऊ घालायचे. लहान मुल कोरडी भाकर खात नाही. निदान वरणाला चव यावी म्हणून मोहफुल उकळून त्यात टाकली जातात, असे महेशने सांगितले.                           या मजूर वर्गाला पोलिसांची नजर चुकवून जंगलात जावे लागत आहे. त्यातही हिंस्र प्राण्यांची भीती वेगळीच. मोहफुल वेचताना वाघ, अस्वल, बिबट्याच्या हल्ल्यात अनेक लोक मारले जात आहेत. मात्र, जगण्यासाठी या मजूर वर्गाला मरण्याची जोखीम पत्करावी लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Salian Case: आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ! दिशा सालियन प्रकरणात ५०० कोटींची भरपाई अन् बिनशर्त माफीची मागणी

Chiplun Flyover Work : चिपळूणकरांसाठी महत्त्वाची बातमी! उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात, पण 'या' कारणामुळे गणेशोत्सवात काम थांबले!

Arnala Fort History: २२९ वर्षांपूर्वी अर्नाळा किल्ल्यावर कसा साजरा व्हायचा गणेशोत्सव? मोडी कागदपत्रांतून ऐतिहासिक रहस्य उलगडलं

Latest Marathi News Update : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Ujani Water Crisis : उजनी परिसरातील वीज दोन तासांवर आणण्याच्या हालचाली ; सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता तीव्र

SCROLL FOR NEXT