police thane 
विदर्भ

ठाण्यातच दोघांची जुंपली, अन्‌ "बघून घेतो' अशी दिली धमकी! 

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : एक व्यक्ती खासगी तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आला होता. त्याचवेळी तेथे असलेल्या एका सहायक पोलिस निरीक्षकाची त्या व्यक्तीवर नजर पडली. त्यानंतर त्यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. वादाची ठिणगी हाणामारीवर येण्यापूर्वीच ठाण्यात उपस्थित पोलिसांनी दोघांनाही पकडले. त्यामुळे पुढील घटना टळला. हा प्रकार यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात सोमवारी, 2 मार्च रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. जोरदार झालेल्या वादावादीनंतर दोघांनीही एकमेकांना "बघून घेतो' हा शब्दप्रयोग केला. याची चर्चा पोलिस वर्तुळात चांगलीच रंगली होती. 

सदर सहायक पोलिस निरीक्षक यापूर्वीदेखील वादग्रस्त ठरले आहेत. एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यामुळे त्या सहायक पोलिस निरीक्षकला स्थानिक गुन्हे शाखेतून दुसरीकडे हलविण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. अवधूतवाडी डीबी, स्थानिक गुन्हे शाखा व नंतर नियंत्रण कक्ष असा त्या अधिकाऱ्याचा प्रवास राहिला आहे. 

दोघांची नजरानजर झाली अन्‌ डोके भडकले

संबंधित सहायक पोलिस निरीक्षक काही कामानिमित्त शहर पोलिस ठाण्यात आले होते. काम आटोपून कारने परत जात असताना, ते आणि पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास आलेल्या व्यक्तीची नजरानजर झाली. दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. हा वाद उफाळून येताच सहायक पोलिस निरीक्षक मोठ्या तावाने आपल्या कारबाहेर आले. दोघांचाही आवाज वाढल्याने ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांनी आवारात गर्दी केली. दोघेही "आखाड्या'च्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना पकडले. मात्र, दोघेही शांत होण्याच्या पवित्र्यात नव्हते. अखेर ठाणेदार धनंजय सायरे यांनी मध्यस्थी करीत त्या सहायक पोलिस निरीक्षकाला आपल्या खास शैलीत ठाण्यातून जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे पुढील प्रसंग होता-होता राहिला. या प्रसंगाची ठाण्यात चांगलीच चर्चा रंगली होती. 

ठाण्यात आलेल्या त्या व्यक्तीने यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षकाविरुद्ध तक्रार नोंदविली आहे. सध्याच कोणतीही कारवाई करू नका, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. ती तक्रार सध्या चौकशीत ठेवली आहे. चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. 
- धनंजय सायरे, ठाणेदार, शहर पोलिस ठाणे, यवतमाळ. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT