majur. 
विदर्भ

घराच्या ओढीने सहाशे किलोमीटर पायी प्रवास केल्यानंतर पकडले पोलिसांनी...आता कुटुंब घराऐवजी विलगीकरण कक्षात

मनोज कनकम

घुग्घुस (जि. चंद्रपूर) : लॉकडाउनमुळे काम थांबले. कंत्राटदारानेही हात वर केले. त्यामुळे जगण्याचा प्रश्‍न निर्माण झाला. उपाशी राहून मरण्यापेक्षा शेवटी त्यांनी गावी परत जायचा निर्णय घेतला. हजार किलोमीटर अंतरावर गाव होते. ते पायीच निघाले. सहाशे किलोमीटरचा प्रवास पायदळच पूर्ण केला. परंतु चंद्रपूर जिल्ह्यात पोहोचले आणि त्यांचा प्रवास थांबला. पोलिसांनी पकडले आणि त्यांना विलगीकरण कक्षात टाकले. पती-पत्नी आणि मुलगा असे हे कुटुंब आहे. आपल्या सोबत जीवनावश्‍यक साहित्य घेऊन हैदराबाद येथून 23 एप्रिल रोजी त्यांनी मध्य प्रदेशातील आपल्या गावाच्या दिशेने प्रवास सुरू केला होता.
कोरोनामुळे अनेक कुटुंबांची वाताहत झाली आहे. या विषाणूने सर्वाधिक हाल मजुरांचे झाले आहेत. मध्य प्रदेशातील चुन्नीलाल बिजीवर (वय 47), ईटाबाई बिजीवर (वय 45) आणि आकाश बिजीवर (वय 23) हैदराबाद येथे कामासाठी गेले होते. मात्र, अचानक लॉकडाउन झाले आणि ते कुटूंब तिथेच अडकले. 14 एप्रिलला लॉकडाउन हटेल, अशी त्यांना आशा होती. परंतु तीन मेपर्यंत त्यात वाढ झाली. त्यामुळे जवळचे पैसे संपले. जगायचे कसे? असा प्रश्‍न त्यांच्यासमोर निर्माण झाला. लोकांनी दिलेल्या मदतीवर त्यांनी काही दिवस काढले. त्यानंतर मदतही मिळणे कठीण झाले. त्यामुळे आपल्या गावाला जाण्याचा निर्णय या तिघांनीही घेतला.                                                         23 एप्रिलला त्यांनी हैद्रराबाद नेकलेस मार्गावरून पायदळ प्रवास सुरू केला. सोबत जीवनावश्‍यक वस्तू घेतल्या. जिथे रात्र होईल तिथे मुक्काम. मिळेल ते खायचे. नाहीतर उपाशीच रात्र काढायची. या परिवाराने तब्बल सहाशे आठ किलोमीटरचा पल्ला पायदळच पार केला. शेवटी त्यांचा चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश झाला.   

सविस्तर वाचा - अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला झाला लॉकडाउनचा फायदा                                                                    परवानगी नव्हती                                                                                                      धानोरा टोल नाक्‍यावरील कर्मचाऱ्याला त्यांनी तुमसरचा मार्ग विचारला. तिथून मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील बागडमर जिल्ह्यात जाता येईल, असे त्यांनी त्या कर्मचा-याला सांगितले. मात्र, सबंधित कर्मचाऱ्याने घुग्घुस पोलिसांना याची महिती दिली. पोलिसांनी प्रवास बंदी कायद्यानुसार त्यांना ताब्यात घेतले. सध्या जिल्ह्याची सीमा सील आहे. बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना परवानगीच घेऊन यावे लागते. या कुटुंबीयांकडे अशी कोणतीही परवानगी नव्हती. घुग्घुस पोलिसांनी त्यांच्या खाण्यापिण्याची सोय केली आणि रात्री दोन वाजताच विलगीकरण कक्षात रवानगी गेली.                                       हे तिघेही बांधकामावर मजूर म्हणून काम करतात. लॉकडाउनमुळे काम नाही. कंत्राटदारानेही हात वर केले. त्यामुळे ते तिघेही आडमार्गाने आपल्या गावी पायीच निघाले. हैदराबाद, सिद्धिपेठ, करीमनगर, मंचेरीयाल, करीमनगर, आसिफाबाद, लक्‍डकोट, गडचांदुर, भोयगाव आणि धानोरा असा त्यांनी प्रवास केला. परंतु ते आपल्या गावी जाऊ शकले नाही. चंद्रपुरात अडकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Union Budget Focus on Election-Bound States : बंगाल, आसाम, केरळसह निवडणूका होणाऱ्या राज्यांना मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातून नेमंक काय मिळालं?

Budget 2026: अर्थसंकल्पात मत्स्यव्यवसायाला नवे बळ! कोळंबी आणि इतर मासे खाद्य स्वस्त होणार; सीफूड निर्यातीसाठी मोठा निर्णय

U19 World Cup, IND vs PAK: वैभव सूर्यवंशी स्वस्तात बाद, पण वेदांत त्रिवेदीचं झुंजार अर्धशतक; भारताचे पाकिस्तानसमोर मोठं लक्ष्य

Indian Royal Family : भारतातील 5 महान राजांचे वंशज काय आज करतायत? कसे आहे त्यांचे जीवन..पाहा ऐतिहासिक वारसा

Ranji Trophy 2026 : थोडी खुशी जादा गम! उत्तरप्रदेशला नमवूनही विदर्भ संघ स्पर्धेबाहेर, मोखाडे अन् मालेवार विजयाचे शिल्पकार

SCROLL FOR NEXT