monkey. 
विदर्भ

ते दोघे बनले आहेत माकडांसाठी देवदूत !

गजानन गारघाटे

 गिरड( जि. वर्धा) : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गिरडच्या बाबा फरीद टेकडीवर येणाऱ्या भाविकांची रेलचेल थांबली आहे.या टेकडीवर वास्तव्यास असणाऱ्या शेकडो माकडांची खानापुर्ती भाविकांनी खावू घातलेल्या प्रसादातून व्हायची.आता या माकडांवर उपासमारीची वेळ आली.यामुळे माकडांची इतरत्तर भटकंती व्हायला लागली आहे. या माकडांचे हाल होवू नये यासाठी गावातीलच काही देवदूत या माकडांना रोज सकाळी खाद्यपदार्थ पुरवित आहेत. त्यामुळे त्या भुकेल्या जीवांना दिलासा मिळाला आहे. या सद्कार्याबद्दल व्यावसायिक राजू बोबडे यांच्यावर  कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पर्यटकांचे आकर्षण
येथील बाबा फरीद दर्गाह टेकडी हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे. शासनाने या टेकडीला पर्यटन क्षेत्र घोषित केले आहे. या टेकडीवर रोज हजारो भाविक आणि पर्यटकांची रेलचेल असते. या टेकडीवर वास्तव्यास असणारे माकडांचे कळप पर्यटकांचे आकर्षण केंदर आहे. येणारा प्रत्येक व्यक्ती या माकडांना फुटाणे, नैवैद्य , प्रसाद खावू घालतो. या टेकडीवरील माकडांचे वेगवेगळी कळप आहे. माकडांची संख्या जवळपास दोनशेच्या घरात  आहे. ही माकडे माणसांसोबत खेळतात.आणि हातून प्रसादही हिसकावून खातात.

माकडांची उपासमार
राज्यासह जिल्ह्यात कोरोनामुळे लाॅकडाऊन आहे. बाबा फरीद दर्गाह टेकडीवर १६ मार्चपासून भाविकांचे येणे बंद आहे. याचा फटका भाविकाकडून मिळणाऱ्या प्रसादावर अवलबून असणाऱ्या माकडांना बसला आहे. नियमित टेकडीवर माणसाची दिसणारी गजबज थांबल्याने माकडांची उपासमार होऊ लागल्याचे दिसताच गावातील व्यावसायिक राजू बोबडे आणि त्यांचे मित्र रवी वरघने दोघेही देवदुताप्रमाणे माकडांना नित्यनेमाने खाऊ देऊन माकडांची भूक शमवित आहेत. ते या माकडांना टमाटर,केळी, गव्हाची चपाती, अन्य खाद्य खाऊ घालून या माकडांची भूक शमवित आहेत.

त्यांच्या या उपक्रमाविषयी  गावात कौतुक केल्या जात आहे. मात्र कोरोनाच्या प्रतिबंधात्मक मानवी उपाययोजनेमुळे वन्यजीव प्रभावित झाल्याची प्रचीती येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Sri Lanka Test Series: भारत-श्रीलंका कसोटी मालिकेची तारीख जाहीर; WTC Final साठी दोन महत्त्वाचे सामने केव्हा व कुठे?

सायलीचं आहे खरी तन्वी, सुभेदारांसमोर येणार सगळ्यात मोठं सत्य, 'ठरलं तर मग'चा शेवट सुरू?

Latest Marathi News Live Update : मुंबईतील मॅनहोल दुर्घटनेवर अंबादास दानवेंची टीका; "मृत्यूसाठी महापालिकाच जबाबदार"

VTU Result 2026: इतिहास घडला! परीक्षा संपताच अवघ्या ५ मिनिटांत 'व्हीटीयू'चा अभियांत्रिकीचा निकाल जाहीर; ६० हजार विद्यार्थ्यांना दिलासा

Maharashtra Government RTI : माहिती अधिकार कायद्यात बदल होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची नरमाई

SCROLL FOR NEXT