file photo 
विदर्भ

ते गेले मोहफुले गोळा करायला जंगलात अन्‌ वाघोबा आले जवळ...मग

सकाळ वृत्तसेवा

राजुरा (जि. चंद्रपूर) : विरुर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या नवेगाव नियतवनक्षेत्रातील कक्ष क्रमांक 145 मध्ये मोहफुले वेचण्यासाठी गेलेल्या नवेगाव येथील बाबूराव लक्ष्मण जिवतोडे (वय 70) यांच्यावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात बाबूराव गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

सध्या देशात कोरोना विषाणूची दहशत असून केंद्र सरकारने लॉकडाउन केले आहे. परंतु लॉकडाउनमुळे मोहफुलाच्या हंगामापासून बरेच मजूर वंचित झाले आहेत. मात्र या संचारबंदीच्या काळातही काही नागरिक इतरत्र फिरताना आढळतात; तर ग्रामीण भागात मोहफुले वेचण्याचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी व काही नागरिक जंगलात जातात.

या भागात वाघाची दहशत

या भागात मागील काही महिन्यांपासून वाघाची दहशत पसरली आहे. वाघाने धुमाकूळ घालून अनेकांना जखमी केले आहे; तर वाघाच्या हल्ल्यात काहींचा जीवही गेला आहे. या भागात वाघाची दहशत असतानाही संधी साधून काही लोक मोहफुले गोळा करण्यासाठी जंगलात जात आहेत.

अन अचानक झडप घातली बाबूराववर

शनिवारी (ता. 18) सकाळी नवेगाव येथील बाबूराव जीवतोडे हे आपल्या सूनबाईसोबत सिद्धेश्वर उपक्षेत्रातील नवेगाव नियतक्षेत्राच्या कक्ष क्रमांक 145 मध्ये मोहफुले गोळा करण्यासाठी गेले होते. मोहफूल गोळा करीत असतानाच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक बाबूराववर झडप घातली. त्यामुळे बाबूराव बांबूच्या रांझीवर जाऊन पडले. त्यानंतर लगेच उभे होऊन त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे वाघाने जंगलात धूम ठोकली.

जंगलात ट्रॅप कॅमेरे लावले

दैव बलवत्तर म्हणून वाघाच्या हल्ल्यातून ते थोडक्‍यात बचावले. मात्र वाघाने त्यांच्या खांद्यावर, पाठीवर पंजे मारून त्यांना जखमी केले. या घटनेची माहिती विरुर वनपरिक्षेत्राचे अधिकारी गजानन इंगळे, क्षेत्र सहायक धोडरे, वनरक्षक अनिल चुधरी यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी पोहोचून तत्काळ जखमी बाबूरावला राजुरा ग्रामीण रुग्णालयात हलविले.

घटनास्थळाचा पंचनामा करताना वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले. त्यामुळे या जंगलात ट्रॅप कॅमेरे लावण्यात येत आहेत. नागरिकांनी जंगलात जाऊ नये, आपल्या घरातच राहावे, असे आवाहन वनाधिकाऱ्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Mayor: शिंदे गटातील नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे परतणार? मुंबईत काय चाललंय? महापौरपदासाठी गूढ वाढलं

BMC Election: मानखुर्दमध्ये ‘एमआयएम’ सरस; मुस्लिम मतदारांचा राजकीय कल बदलल्याचे चित्र, अपेक्षेहून अधिक यश!

RAC बंद, सेकंड क्लासला किमान ५० किमी तर स्लीपर क्लाससाठी २०० किमीचे भाडे द्यावंच लागेल; रेल्वेचे नवे नियम

Panchang 18 January 2026: आजच्या दिवशी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे आणि ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा

HAL Recruitment 2026: HAL अप्रेंटिस भरती 2026 जाहीर; जाणून घ्या पात्रता आणि वॉक-इन अर्ज प्रक्रिया

SCROLL FOR NEXT