motorbike-accident 
विदर्भ

दुचाकीवर चौबलसिट चालले होते अन्‌ मागून दिली वाहनाने धडक.... 

सकाळ वृत्तसेवा

शंकरपूर (जि. चंद्रपूर) : दुचाकीवर चौबलसिट चाललेल्या वाहनधारकाला दुसऱ्या भरधाव वाहनाने मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात एकजण ठार, तर तीनजण जखमी झालेत. ही घटना रविवारी (ता. 31) दुपारी 4 वाजताच्या सुमारास शंकरपूरजवळील डोमा शिवार फाट्याजवळ घडली. इंदिरा दडमल (वय 50, रा. सिरसपूर) असे मृताचे, तर प्रीती नन्नावरे (वय 26), कैलास दडमल (वय 30), माही नन्नावरे (वय 5) अशी जखमींची नावे आहेत. 

कैलास दडमल हे इंदिरा दडमल, प्रीती नन्नावरे व पाच वर्षांची चिमुकली माही नन्नावरे यांना घेऊन दुचाकीने मेंढेगाव येथून सिरसपूर येथे जाण्यासाठी निघाले होते. डोमा फाट्यावरून सिरसपूरकडे वळण घेत असताना मागून येणाऱ्या चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात इंदिरा दडमल या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. तर प्रीती नन्नावरे, कैलास दडमल, माही नन्नावरे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विनोद जांभुळे करीत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

'दृश्यम ३' मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही' म्हणणाऱ्या मराठी अभिनेत्याला नेटकऱ्यांनी सुनावलं; म्हणाले- तुम्ही लोक

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT