deshi katte 
विदर्भ

चाबी बनविण्याच्या नावाखाली ते विकत होते "हे' ...अडकले जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा

धारणी (जि. अमरावती) : येथून तीन किलोमीटर अंतरावरील वसंतराव नाईक महाविद्यालयाजवळ सोमवारी (ता.20) सायंकाळी धारणी पोलिसांनी दोन युवकांकडून चार देशी कट्टे व दोन जीवंत काडतुस जप्त केले आहे. यावरून मध्यप्रदेशातून धारणीत देशी कट्ट्यांची तस्करी होत असल्याचे सिद्ध झाले आहे. 

चार देशी कट्टे विकण्याचा केला सौदा

प्राप्त माहितीनुसार, धारणी शहरात दोन वर्षांपासून बऱ्हाणपूर जिल्ह्यातील पाचोरी (ता. खकनार) येथील लखबीर अकालसिंह खिंची उर्फ लकी (वय 19) व संजयसिंग जसपाल पटवा (वय 21) चाबी बनविण्याचे काम करण्यासाठी धारणीत येत होते. चाबी बनविण्याच्या आडून ते देशी कट्ट्यांची तस्करी करीत होते. सोमवारी या दोघांनी तालुक्‍यातील एका व्यक्तीसोबत चार देशी कट्टे विकण्याचा सौदा केला होता. 

पोलिसांनी रचला सापळा

त्याप्रमाणे ते दोघेही बऱ्हाणपूर- खंडवा- इंदौर या राज्य महामार्गावर असलेल्या वसंतराव नाईक महाविद्यालयाजवळ चार देशी कट्टे व दोन जीवंत काडतूस घेऊन उभे होते. याची माहिती सोमवारी सायंकाळी धारणी पोलिसांना मिळाली. त्याआधारे सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास सहायक पोलिस निरीक्षक तांबे, कान्होपात्रा बनसा, पीएसआय भारत लसंते, अरविंद सरोदे, रवींद्र वऱ्हाडे, प्रभाकर डोंगरे, गणेश डहाके यांनी सापळा रचून त्या दोघांना अटक केली. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून चार देशी कट्टे व दोन जीवंत काडतूस जप्त गुन्हा दाखल केला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT