Saoji mutton sakal
विदर्भ

चोरांचा मटणावर डल्ला, मतदारांनी अंड्यांवर भागवली भूक

गोंडपिपरीतील प्रकाराची रंजकदार चर्चा

संदीप रायपुरे

गोंडपिपरी : मतदारांना खूष करण्यासाठी उमेदवाराने पार्टीचे (Party)आयोजन केले.साधारणत तीस लोकांसाठी सात किलो मटन(Seven kg mutton) घेतले.गावात विषय नको म्हणून आडबाजूला चिंचेच्या झाडाखाली पार्टीचे नियोजन ठरले.मटन तयार करण्यासाठी इतर साहित्य जमा करण्यात आले.मटनावर ताव मारण्यासाठी मतदार याठिकाणी जमा झाले.जेवनापुर्वी मद्यपान करण्यासाठी हि मंडळी थोडीशी बाजुला गेली.पार्टीच्या ठिकाणी परतल्यानंतर उमेदवाराला धक्काच बसला.कारण सात किलो मटन चक्क गायब झाली होती.मतदारांना या प्रकाराची माहिती मिळाली अन त्यांचा हिरमोड झाला.

शेवटी मटनाची पार्टी अंड्यावर निभवावी लागली.गोंडपिपरीत सध्या नगरपंचायतीच्या तिन प्रभागात निवडणुकीची रणधुमाळी सूरू आहे.यातील प्रभाग क्रमांक पंधरा मधील उमेदवारासोबत घडलेल्या या प्रकाराची रंजकदार चर्चा सूरू आहे.ती सात किलो मटन नेमकी कुणी चोरली याचा शोध उमेदवार घेत आहे.ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आले.अन या प्रभागात सर्वसाधारण प्रवर्गासाठी उमेदवारी जाहिर झाली. तिन प्रभागापैकी पंधरा क्रमाकांच्या प्रभागात कमालीची रस्सीखेच आहे.या प्रभागात एकून पाच उमेदवार उभे आहेत.यापैकी दोन सख्ख्या जावा प्रभागात आमनेसामने आहेत.संपत्ती लपविल्याच्या आरोपाने या प्रभागातील प्रकरण जिल्हा न्यायालयात पोहचले होते.यामुळ या प्रभागातील निवडणुकांत कमालीची रंगत निर्माण झाली.अशात या प्रभागातील एका उमेदवार पतीन मतदारांसाठी बकरापार्टीचे आयोजन केले.गावात विषय व्हायला नको म्हणून गावालगत आडाबाजूला चिंचेच्या झाडाखाली पार्टी निश्चीत झाली.साधारणत तिस मतदारासाठी सात किलो मटन घेण्यात आले.मटन बणविण्यासाठीचे सःपुर्ण साहित्य नेण्यात आले.

मतदारांना तिथे पाचारण करण्यात आले.पार्टीची सूरवात म्हणून मद्यपानासाठी उमेदवार या मंडळीला घेऊन बाजूला गेला.मद्यपान झाले अन मटन शिजविण्याची तयारी करण्याकरिता उमेदवार आला..अन बघतो तर काय मटन गायब होती.मटन चोरट्याने लांबविली हे लक्षात यायला त्याला वेळ लागला नाही.मटनाची चोरी झाल्याची माहिती कळताच मतदारांत कमालीची अस्वस्थता पसरली.याठिकाणी याप्रकारावरून बरीच चर्चा झाली.आजुबाजूला मटनाची शोधाशोधही करण्यात आली.पण मटणाचा काहीच पत्ता लागला नाही.शेवटी मतदाराःची समजूत काढीत उमेदवाराने मटनाची पार्टी अंड्यावर निभवली.गोंडपिपरीत घडलेल्या या प्रकाराची खमंग चर्चा सूरू आहे.आपली मटन नेमकी कुणी चोरली याचा शोध आता उमेदवार घेत आहे.दरम्यान विरोधी उमेदवाराने माणूस पाठवून मटनाची चोरी करायला लावल्याची जोरदार चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT