Thieves robbed a temple in Chandrapur 
विदर्भ

हे देवाऽऽ! मंदिर उघडताच चोरट्यांनी फोडली दानपेटी; सीसीटीव्हीवर झाकले होते पोते

संदीप रायपुरे

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : महाराष्ट्र व तेलंगणातील शेकडो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या धाबा येथील कोडंया महाराज देवस्थानातील दानपेटी भामट्यांनी फोडली. घटनेची माहिती कुणालाही होऊ नये यासाठी चोरट्यांनी मंदिर परिसरातील सीसीटीव्हीला पोत्यांनी झाकून वायर कापले व दानपेटी फोडली. राज्य सरकारने मंदिर उघडण्यास परवानगी दिल्यानंतर पहिल्याच दिवशी हा प्रकार घडला. मंदिर प्रशासनाने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथे श्री संत कोंडया महाराज देवस्थान आहे. विदर्भ व तेलंगणातील हजारो भक्तांची महाराजांवर मोठी श्रध्दा आहे. मंदिराच्या बाहेर एक तर आत एक अशा दोन दानपेट्या आहेत.

यापैकी बाहेर असलेल्या दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारला. मंदिर परिसरात सीसीटीव्ही आहे. आपल्या चोरीचा प्रकार उघड होऊ नये यासाठी त्यांनी सीसीटीव्हीवर चक्क पोते झाकले होते. नंतर वायरी कापले व दानपेटी फोडली.

चोरट्यांनी मंदिर उघडताच रक्कम लांबविली. मागील पंधरवाड्यापूर्वी देखील असाच प्रकार घडला होता. मंदिर प्रशासनाने दानपेटी फोडल्याच्या घटनेची तक्रार पोलिसात दाखल केली आहे. याप्रकरणाचा तपास धबा पोलिस करीत आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुरुंगातही व्यभिचार! माजी खासदार Prajwal Revanna च्या फोनमध्ये सापडले 90 अश्लील Video, कोठडीत मोबाईल अन् पेन ड्राईव्ह कसा गेला?

Gadchiroli Ashramshala: आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणी माजी खासदार आणि मुलासह ५ जणांवर गुन्हा दाखल

महाराष्ट्रात ५ वर्षात ३६ हजार कंपन्या बंद पडल्या, केंद्र सरकारने सांगितलं असलं तरी माहिती तपासणार : उद्योगमंत्री सामंत

Delhi Protest: ‘जंतरमंतर सीझन-टू’ लवकरच: ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजित दीपके, ३७ दिवसांच्या आंदोलनानंतर नवी घोषणा

Maharashtra Rain Alert : कोकण-मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता, मुंबई-पुण्यात कसं असेल हवामान?

SCROLL FOR NEXT