phone snatcher 
विदर्भ

पायदळ जाताय ना, मग मोबाईलवर बोलू नका; चोरटे आहेत तुमच्या मागावर!

संतोष ताकपिरे

अमरावती ः रहदारीच्या रस्त्यावरून पायदळ जाणाऱ्यांचे मोबाईलवर बोलणे घातक ठरत असल्याचे अलिकडच्या घटनांवरून दिसून येत आहे. कारण तुम्ही मोबाईलवर बोलत असताना पाठीमागून हळूच येणारा दुचाकीस्वार तुमच्या हातातील मोबाईल कधी हिसकावून पळून जाईल याचा नेम राहिला नाही. शनिवारी (ता. तीन) राजापेठ व बडनेरा हद्दीत दोघांचे मोबाईल अशाच भामट्यांनी हिसकावून पळ काढला. 

राजापेठ हद्दीत क्रांती कॉलनीतील दिल्ली पब्लिक स्कूलजवळून भास्कर दिगंबर प्रभुणे हे रस्त्याने पायदळ जाताना मोबाईलवर बोलत होते. त्यांचा पाठलाग करीत आलेल्या दुचाकीस्वाराने त्याचा १५ हजार रुपयांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. राजापेठ पोलिसांनी प्रभुणे यांच्या तक्रारीवरून मोबाईल पळवून नेणाऱ्या अनोळखी दुचाकीस्वाराविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. 

राजापेठ हद्दीतील घटनेनंतर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटातच तशीच घटना बडनेरा ठाण्याच्या हद्दीत जुनीवस्ती बैलबाजारात पेट्रोलपंपासमोर सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली. या घटनेत फरदीन खान वल्द फिरोज खान (वय १८) हा युवक कामावरून परत येत असताना रस्त्याने आईचा फोन आला. म्हणून तो रस्त्याने जाताना फोनवर बोलत होता. तेवढ्यात अचानक दुचाकीवरून आलेले दोघेजण फरदीन खानजवळ थांबले. त्यापैकी एकाने त्याला पत्ता विचारला तर, दुसऱ्याने त्याच्याकडील सात हजार रुपयांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. फरदीन खान याच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनीही जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. 

दोन्ही घटनेमागे एकच टोळी

आधी राजापेठ व दहा मिनिटातच बडनेरा हद्दीत सारख्याच घटना घडल्या. त्यात दोन्ही घटनेमागे एकच टोळी असल्याची शक्‍यता पोलिस पडताळून बघत आहेत. महिनाभरापूर्वी एकाच दिवशी रस्त्याने जाणाऱ्या तीन युवतींचे मोबाईल अशाच पद्धतीने हिसकावून नेण्यात आले होते. त्याचा अद्याप शोध लागलेला नाही. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED action on Sahara Group : सहारा ग्रुपवर 'ED'ची मोठी कारवाई; कोट्यवधींच्या घोटाळ्यात आरोपपत्र दाखल

Ganpati Visarjan 2025 Live Updates : दरवर्षी सारखी जुहू चौपाटीवर गर्दी नाही

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवात 'चिकमोत्याची माळ' गाण्यावर थिरकली तरुणाई; सोशल मीडियावर रील्सना प्रचंड प्रतिसाद

Viral Video: भक्तीची ताकद की गणरायाचा चमत्कार? पाण्याचा मोठा प्रवाह, तरीही विसर्जनावेळी मूर्ती वाहून गेलीच नाही, पाहा व्हिडिओ

अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मराठी कलाकारांनी घेतले शामनगरच्या राजाचे दर्शन

SCROLL FOR NEXT