thirty seven more patients in Vidarbha 
विदर्भ

विदर्भ ब्रेकिंग : कोरोनाचा आलेख वाढताच; एकाच दिवशी आढळले तब्बल इतके रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विदर्भासाठी मंगळवारचा दिवस चांगली वार्ता घेऊन आला नाही. तीन जिल्ह्यामंध्ये तब्बल 37 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यात सर्वाधिक रुग्ण यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. यवतमाळमध्ये 17, नागपुरात 12 व अमरावतीत आठ असे एकूण 37 रुग्णांचा अहवाला पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली आहे. 

रोज नवीन वस्तीत कोरोनाचा शिरकाव होत असल्याने येणाऱ्या दिवसात कोरोना अधिक घातक ठरण्याची दाट शक्‍यता आहे. दर दिवसाला दोन आकड्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासन चिंतेत आहे. अवघ्या चार दिवसांत शंभर कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. सोमवारी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह 19 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. मंगळवारी आढळलेल्या 11 रुग्णांमुळे एकूण रुग्णांची संख्या 571 झाली आहे. यातील सहा व्हीएनआयटी तर पाच जण पाचपावली विलगीकरण केंद्रातील आहेत.

मागील अडीच महिन्यात बजाजनगर, अभ्यंकरनगर, खामला, जयनगर, जरीपटका, मोमिनपुरा, सतरंजीपुरा, टिमकी, हंसापुरी, बैरागीपुरा, गोळीबार चौक, शांतीनगर, कुंदनलाल गुप्तनगर, दलालपुरा, इतवारी, राजीव गांधीनगर, संगमनगर, यशोधरानगर, गौतमनगर, गिट्टीखदान, कुशीनगर, खरबी, खलाशीनगर, हावरापेठ, संतोषनगर, नाईक तलाव, बांगलादेश, वसंतनगर, काशीनगर, शताब्दीनगर, खरबी, इंदोरा अशा पन्नास वस्त्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. 

ही जोखीम उपराजधानीच्या माथ्यावर आहे. तसेच आमदार निवास विलगीकरण केंद्रातील एका डॉक्‍टरसह आरोग्य कर्मचारी बाधित आढळून आला. यामुळे रविवारी येथील पाच जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यांचे नमुने नकारात्मक आले. मात्र, घाबरलेल्या इतर डॉक्‍टरांसह आरोग्य कर्मचारी अशा 12 जणांचे नमुने सोमवारी सकाळी तपासणीसाठी घेण्यात आले. 

मध्य नागपूरच हॉटस्पॉट

नागपूर शहरात 11 मार्च ते आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचा आकडा नियंत्रणात असला तरी बाधितांचा आकडा मात्र फुगत आहेत. शहरातील अनेक वस्त्या कोरोनाचे "हॉटस्पॉट' ठरत आहेत. मोमिनपुरा, सतरंजीपुरा, गोळीबार चौक, नाईक तलाव हॉटस्पॉट ठरले आहेत. यापुढची वस्ती कोणती असेल हे सांगता येत नसले तरी मध्य नागपुरातील या सगळ्या वस्त्या आहेत.

यवतमाळमध्ये एकाच कुटुंबातील 13 रुग्ण

संस्थात्मक विलगीकरण कक्षात भरती असलेल्या 17 जणांचे रिपोर्ट मंगळवारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी 13 व्यक्ती एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ऍक्‍टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकूण 36 झाली आहे. पॉझिटिव्ह असलेल्या एका रुग्णाचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात कोरोनाबधित मृतांची संख्या तीन झाली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 145 वर गेला आहे. त्यापैकी 106 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेल्याचे प्रशासनाने कळविले आहे. 

अमरावतीत आठ संशयित रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह

आठ संशयित रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आठ जणांमध्ये चार महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. हे रुग्ण फ्रेझरपुरा, रतनगंज, मालू ले-आउट (सातुर्ना), मसानगंज, जलारामनगर या भागातील रहिवासी आहेत. मालू ले-आउट, जलारामनगर हे दोन्ही नवीन परिसर आहेत. उर्वरित ठिकाणी यापूर्वी कोरोना संक्रमित आढळले आहेत. आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 238 झाले आहेत. बरे होऊन 124 जण घरी गेले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : पारोळा तालुक्यात पावसाअभावी लघु प्रकल्पांचा घसा कोरडाच

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT