adhik maas esakal
विदर्भ

Adhik Maas : अधिक मासामुळे बाप्पांचे आगमन लांबले

गणेशभक्तांना आतुरताः १९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर गणेशोत्सव

सकाळ डिजिटल टीम

लोणार : यंदा अधिक मासामुळे गणपती बाप्पांचे आगमन लांबले असून स्थापना १९ दिवस उशिराने होणार आहे. गतवर्षी गणपती बाप्पांचे आगमन ३१ ऑगस्टला झाले होते. यावर्षी बाप्पा घरोघरी १९ सप्टेंबरला विराजमान होणार आहेत. तर अनंत चतुर्दशी २८ सप्टेंबर रोजी आहे.

बाप्पांच्या आगमनाची गणेशभक्तांना आतुरता लागली आहे. यंदा मूर्तिकारांना मूर्ती घडवण्यासाठी अधिकचा वेळ मिळाला आहे. तरीही मूर्तिकार जोमाने कामाला लागले असून लाखो मूर्ती तयार करण्यात दिवस-रात्र व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मागील वर्षी ३१ ऑगस्ट २०२२ ला गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचे आगमन झाले होते. तर ९ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला होता. मात्र, यंदा १९ सप्टेंबरला गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरु होणार असून, २८ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे.

यावर्षी गणरायाचा मुक्काम १० दिवसांचा असणार आहे. गणेशोत्सव सुरू होण्यासाठी अजून महिना बाकी आहे. मूर्तिकारांनी मार्च महिन्यापासूनच मूर्ती घडवण्याची लगबग सुरू केली आहे. जसजसे दिवस जात आहेत, तसतसे मूर्ती बनवण्याचा वेग वाढत आहे. सध्या मूर्ती बनवणे व त्याचे फिनिशिंग करणे सुरू आहे.

काही दिवसांनंतर रंगरंगोटीचे काम सुरू होईल. मूर्तिकार सदैव गणपती बाप्पा विविध रूपात साकारण्याचा प्रयत्न करत असतात. यंदा अधिक मासामुळे जास्तीचा वेळ बाप्पांच्या नवनवीन स्वरूपातील मूर्ती बनविण्यासाठी मिळाला असून, मूर्तिकार नवीन मूर्ती घडवत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे! राहुल गांधींचा मोर्चाआधी मोठा इशारा, 'एसआयआर' मधील खरे गुन्हेगार दुसरेच..

IND vs NZ : भारतीय संघाला धक्का, स्टार फलंदाजाने लंगडत मैदान सोडले; न्यूझीलंड दौऱ्यासाठी उद्या होणार होता रवाना, पण...

Ladki Bahin Yojana Payment Update : ...तर खात्यात जमा होणार एकत्र 3000 रुपये? लाडकी बहीण योजनेच्या नव्या अपडेटने वाढवली उत्सुकता, नवरात्रीत लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार?

SCROLL FOR NEXT