The thoughts of Vivekananda and Gandhi are the same
The thoughts of Vivekananda and Gandhi are the same 
विदर्भ

विवेकानंदांचे आणि गांधींचे विचार एकच

सकाळवृत्तसेवा

हिवरा आश्रम (बुलडाणा) : विवेकानंदानी सांगितलेली धर्मविचार, सामाजिक उत्थानासाठी दिलेली शिकवण, व मानवाच्या कल्याणासाठी जगाला केलेले मार्गदर्शन ही महात्मा गांधींच्या जीवनातील मुलतत्वे ठरली आहेत. विवेकानंदानी सर्व जातीधार्मीय लोकांना हृदयाशी कवटाळले. गांधीनी हाच धागा पकडून सर्वधर्मीयांप्रती सहिष्णुतेची भावना धारण केली. विवेकानंद आधी जगाला कळाले आणि नंतर भारतीयांनी त्यांना स्वीकारले. गांधीना सुद्धा आफ्रिकेतून आपले कर्तृत्व सिद्ध करता आले आणि नंतर ते भारतीयांना कळाले. विवेकानंदानी जगाला केलेल्या उपदेशाची परिपूर्णता महात्मा गांधींच्या जगण्यात आढळते म्हणून महत्मा गांधी हे विवेकानंदांच्या विचारांची निष्पत्ती आहे असे विचार विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी विवेकानंद विद्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात मार्गदर्शन करताना केले.

         महात्मा गांधी आणि एकविसावे शतक या विषयावर त्यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. एस. शेळके व महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. मनीषा कुडके या व्यासपीठावर उपस्थित होत्या. एकविसाव्या शतकात निर्माण होणाऱ्या सर्व समस्यांवर गांधी विचारात उपाय सांगितले आहेत. चंगळवाद, वाढते प्रदूषण, धर्मांधता, आर्थिक विषमता, साम्राज्य विस्तार, देशांतील वाढते कलाह युद्ध या सर्व प्रश्नांसाठी जगाने गांधी विचार आत्मसात करण्याची गरज आहे. तरुण वयात न आवडणारे न, पटणारे महात्मा गांधी अभ्यासाअंती कळू लागतात व त्यांचे श्रेष्ठत्व लक्षात येते, म्हणून गांधींची चरित्रहनन करणारी पुस्तके न वाचता प्रत्येक तरुणाने माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाच्या वाचनातून गांधींकडे पाहणे शिकावे असेही त्यांनी पुढे बोलताना सांगितले.

         गांधीना विवेकानंदांचा सहवास लाभला असता तर जगाचे अधिक भले झाले असते. भगवे वस्त्र धारण करणारे स्वामीजी खऱ्या अर्थाने मातृभूमीचे सेवक होते. महात्मा गांधीनी सुद्धा देश म्हणजे देशातील जनता व त्यांच्यावर प्रेम म्हणजे मातृभूमीवर प्रेम हा स्वामी विवेकानंदांचा विचार अंगिकारला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालीकराम निकस, तर सुत्रसंचालन वैष्णवी मते, प्रियांका वाघ तर आभार प्रदर्शन शीतल वाहेकर हिने मांडले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

Gold Rate Today: सोन्या-चांदीची चमक पुन्हा वाढली; काय आहे या वाढीमागचे कारण?

Jalgaon NEET Exam : 40 अंश तापमानात ‘नीट’ परीक्षेने काढला भावी डॉक्टरांचा घाम; पालकांचीही कसोटी

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jonty Rhodes IPL 2024 : बॉल बॉयचा भन्नाट कॅच... टिप्स देणाऱ्या जाँटीने थोपटली पाठ; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT