पुसद (जि. यवतमाळ) : बॅंकेपुढे लावण्यात आलेला बॅंकबंदचा सूचनाफलक. 
विदर्भ

बापरे! पुसद शहरातील या तीन बँका अखेर का झाल्या बंद

दिनकर गुल्हाने

पुसद (जि. यवतमाळ) : पुसद शहरात कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरातील भारतीय स्टेट बॅंक, महाराष्ट्र बॅंक व युनियन बॅंकेतील कर्मचारी कोविड-१९ पॉझिटिव्ह निघाल्याने या तीनही बॅंक गेल्या आठवड्यापासून बंदच आहेत. त्यामुळे बॅंकेचे व्यवहार ठप्प पडले असून ग्राहकांची कुचंबणा होत आहे.

कोरोनामुळे १५ दिवस बॅंका बंद ठेवण्याचे आदेश कुणाचे आहेत, असा प्रश्न येथील व्यावसायिक धनंजय सोनी यांनी रिझर्व्‍ह बॅंकेला विचारला असून, बॅंकेचे काम पूर्ववत सुरू करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

बॅंकेचे व्यवहार ठप्प, ग्राहकांना त्रास

सध्याचे दिवस हे सणासुदीचे आहेत. लॉकडाउननंतर व्यापारी आधीच आर्थिक अडचणीत आलेले आहेत. कठीण परिस्थिती व्यवसाय सुरू असताना बॅंकेचे व्यवहार ठप्प झाल्याने नवीनच प्रश्न व्यापाऱ्यांच्या पुढे उभे ठाकलेले आहेत. बॅंकेचे व्यवहार बंद असल्याने पैसे ट्रान्सफर करणे, पैसे काढणे, शेतकरी व मजूर वर्गाचे छोटे-मोठे व्यवहार थांबले आहेत.

बॅंक बंद ठेवण्याचा आदेश कुणाचा?

बॅंक बंद असल्याचा परिणाम पुसदच्या बाजारपेठेवर झालेला आहे. बॅंकेमध्ये बरेचसे कर्मचारी असताना पॉझिटिव्ह कर्मचारी सोडून इतर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था निर्माण होऊ शकते. बॅंक बंद ठेवल्याने अर्थव्यवस्थेला फटका बसत आहे. अशा परिस्थितीत पूर्णतः दहा ते १५ दिवस बॅंक बंद ठेवण्याचा आदेश कुणी दिलेला आहे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नर यांना पत्र

बॅंक बंद करण्याच्यासंदर्भात येथील व्यावसायिक धनंजय सोनी यांनी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया कस्टमर केअर सेंटरला संपर्क साधला असता, बॅंक बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. बॅंकेतील कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह निघाल्यानंतर केवळ ४८ तास बॅंक बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. पर्यायी व्यवस्था बॅंकेने करावी असे कस्टमर केअर सेंटरवरून सांगण्यात आले. त्यामुळे दोन आठवड्यापर्यंत बॅंक बंद ठेवण्याचा आदेश कोणाचा आहे, असा प्रश्न त्यांनी केला. यासंदर्भात त्यांनी रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नर यांना मेलवरून पत्र पाठवीत बॅंका लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought Criteria : दुष्काळ निकषांची पडताळणी सुरू बारा ऑक्टोबरपूर्वी घोषणा शक्य

Gokul Election 2026 : 'गोकुळ'चं राजकारण तापलं! मंत्री मुश्रीफ, विनय कोरेंनी नियोजित दौरे रद्द करून गाठली मुंबई; नेत्यांची जोरात फिल्डिंग, राजकीय चर्चांना उधाण

Latest Marathi News Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर जोरदार पाऊस

Aaditya Thackeray Disha Salian case : आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ? दिशा सालियानचे वडील सतीश सालियान अब्रुनुकसानीची नोटीस घेऊन मातोश्रीवर जाणार

PM Kisan e-KYC : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! 'पीएम किसान'साठी 31 ऑक्टोबरची मुदत; ई-केवायसी, भूमी अभिलेख नोंद पूर्ण करणे आवश्यक, ताबडतोब करा 'हे' काम

SCROLL FOR NEXT