विदर्भ

मोठी बातमी : तीन मुलींचा वैनगंगा नदीमध्ये बुडून करूण अंत

अमित साखरे

चामोर्शी (जि. गडचिरोली) : तालुक्यातील भेंडाळा परिसरातील वाघोली गावातील (Wagholi village) तीन मुलींचा वैनगंगा नदीमध्ये बुडून करून अंत (three girl died) झाल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. सोनी मुकरू शेंडे (वय १३), समृद्धी ढिवरू शेंडे (वय ११) व पल्लवी रमेश भोयर (वय १५) अशी मृतांची नावे आहे. (Three girls drown in Wainganga river)

सतत शाळा बंद राहत असल्याने आणि शाळेला सुट्ट्या असल्याने ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांचा कल हा अभ्यासाऐवजी खेळाकडे लागलेला आहे. बुडून अंत झालेल्या मुली दुपारच्या सुमारास डोंग्यात बसून आंबे तोडण्यासाठी गेल्या होत्या. डोंगा खोल पाण्यात गेला तेव्हा तोल गेला आणि तिन्ही मुली डोंग्याच्या खाली आल्या. खोल पाण्यात तिन्ही मुलींना पोहता न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

डोंगा चालवणारा नावकरी केवटराम मनोहर शेंडे हा कसाबसा पोहून दुसऱ्या काठावर पोहोचू शकला. पण तिन्ही मुलींना तो वाचवू शकला नाही. विशेष म्हणजे मृत झालेली सोनी आणि समृद्धी या सख्या चुलत बहिणी आहेत. पल्लवी ही या दोन मुलींची मेहुणी लागते. ही घटना गावांमध्ये पसरताच शोककळा पसरली. घटनेची माहिती मिळताच चामोर्शी येथील पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले. यानंतर अंत्यसंस्कारासाठी तिन्ही मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले.

मामाकडे आली आणि गेला जीव

सोनी ही विश्वशांती विद्यालय भेंडाळा येथे आठव्या वर्गात शिकत होती. समृद्धी ही गावातीलच जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चवथ्या वर्गात शिकत होती. तर पल्लवी ही गडचिरोली तालुक्यातील येवली येथील असून ती मामाकडे वाघोलीला आली होती. ती दहावीला होती.

(Three girls drown in Wainganga river)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेवटच्या दिवशी PM मोदी आणि शहा आले, ४ मिनिटात कामकाज आटोपले; लोकसभा अनिश्चित काळासाठी तहकूब

Shaktipeeth Highway Protest : जयंत पाटील, राजू शेट्टी एकत्र! 'शक्तिपीठ' रद्द करण्यासाठी सांगलीत मोठ्या आंदोलनाची घोषणा; 31 गावांतील 3 हजार एकरांहून अधिक जमीन बाधित

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका! डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह बड्या ब्रँड्सवर FDAची धाड; 5 परवाने निलंबित

Independence Day 2026: तिरंगा थीमवर सजवा घर, शाळा अन् ऑफिस! १५ ऑगस्टला नक्की ट्राय करा 'या' भन्नाट डेकोरेशन आयडियाज!

Latest Marathi News Live Update : पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकारचे अत्यंत अहंकारी वर्तन- कॉंग्रेस

SCROLL FOR NEXT