three people from same family died in accident at amravati 
विदर्भ

अख्खं गाव हळहळलं! पती-पत्नी पाठोपाठ मुलीचाही मृत्यू, एकाचवेळी निघाली तिघांची अंत्ययात्रा

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : अमरावती -नागपूर महामार्गावर रिंगरोड चौकात दुचाकीला ट्रेलरची धडक बसल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आधी पती, त्यानंतर मुलगी आणि काही तासातच पत्नीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी (ता.१८) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही घटना घडली. गौतम शंकर मेश्राम (वय ४५), पत्नी कविता गौतम मेश्राम (वय ४०) व मुलगी जिया गौतम मेश्राम (वय नऊ, सर्व रा. विर्शी) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. 

गौतम मेश्राम हे मजुरी करतात. कामगार म्हणून त्यांच्या नावाची अमरावती येथील कार्यालयात नोंद झाली होती. किट घेण्यासाठी ते पत्नी व लहान मुलीसह गुरुवारी (ता.१८) अमरावतीला आले होते. त्यानंतर कपडे खरेदी करून सायंकाळी एमएच २७ बीयू ९९४५ क्रमांकाच्या दुचाकीने नांदगावपेठ येथे गेले होते. तेथून परत विर्शीकडे जात असताना महामार्गावरील रिंगरोडवर एनएल ०१ एई ४६७७ क्रमांकाच्या ट्रेलरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात पती-पत्नीसह चिमुकली जखमी झाली. जखमींपैकी गौतम मेश्राम यांचा गुरुवारी (ता.१८) जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर मुलगी जिया व पत्नी कविता यांना शहरातील दोन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान आधी मुलगी जिया हिचा तर, त्यानंतर आई कविता मेश्राम यांचाही मृत्यू झाला. नांदगावपेठ पोलिसांनी ट्रेलरचालक प्रशांत रामजुध्या शर्मा (रा. अजगरी, बिहार) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. 

तिघांचीही सोबतच अंत्ययात्रा -
एकाच कुटुंबातील तिघांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर विर्शी गावात शोककळा पसरली. शुक्रवारी (ता.१९) शवविच्छेदनानंतर गावात तिघांवरही एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

Modi UAE Visit: तेल, LNG-LPG आणि ५ अब्ज डॉलर गुंतवणूक अन्... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळालं?

SCROLL FOR NEXT