cornona negative 
विदर्भ

कोरोना पॉझिटिव्ह युवतीच्या संपर्कातील वाहनचालकाचा स्वॅब अहवाल आला...

सकाळवृत्तसेवा

चंद्रपूर : चंद्रपुरातील बिनबा गेट परिसरातील 23 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण झाल्याचे 13 मे रोजी समोर आल्यानंतर तिच्या संपर्कातील लोकांच्या स्वॅबची तपासणीसाठी पाठविण्यात आले. या युवतीच्या कुटुंबातील पाच सदस्यांचा अहवाल आधीच निगेटिव्ह आला आहे. आता तिच्या संपर्कातील वाहन चालक आणि तिच्या आत्याचा अहवाल सुद्धा निगेटिव्ह आला आहे. 

या युवतीच्या आईची तब्येत बरी नव्हती. त्यामुळे टाळेबंदीपूर्वी यवतमाळ येथील एका खासगी रुग्णालयात तिच्या आईला उपचारासाठी दाखल केले. टाळेबंदी लागली आणि ते तिकडेच अडकली. ती तिच्या आत्याकडे तिथे वास्तव्याला होती. दरम्यान 9 मे रोजी परवानगी घेऊन युवती चारचाकी वाहनाने इथे परतली. तिला कोरोनाची बाधा यवतमाळ येथेच झाली. त्यामुळे तिला पोचविणाऱ्या वाहन चालकाच्या चाचणी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यवतमाळ येथेच या चालकाचे आणि तिच्या आत्याचे स्वॅब घेण्यात आले. त्यांचा अहवाल आज शनिवारला निगेटिव्ह आला. त्यामुळे चंद्रपूरकर आणि यवतमाळवासींनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला.

जिल्ह्यात 2 मे रोजी 1 रुग्ण तर 13 मे रोजी 1 रुग्ण पॉझिटिव्ह आढळला होता. या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. जिल्ह्यात एकूण 339 नमुने घेण्यात आले असून 304 नमुने निगेटिव्ह आले आहे तर 33 नमुने प्रतीक्षेत आहे. शहरातील कृष्ण नगर व बिनबा परिसर प्रशासनाने सील केला असून हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलेला आहे.

आरोग्य विभागाने आज जारी केलेल्या मेडिकल बुलेटिन मध्ये 2 मे रोजी आढळलेला कृष्णनगर येथील पॉझिटिव्ह रुग्ण सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे उपचारासाठी दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. तर जिल्ह्यात बिनबा गेट जवळ 13 मे रोजी 23 वर्षीय युवती पॉझिटिव्ह आढळली होती. या युवतीला सध्या विलगीकरण कक्ष चंद्रपूर येथे भरती करण्यात आले असून या युवतीची प्रकृती स्थिर आहे.

जिल्ह्यामध्ये आजपर्यंत 699 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहे तसेच, गृह अलगीकरण पूर्ण झालेले एकूण 41 हजार 375 नागरिक आहेत.तर सध्या गृह अलगीकरण सुरू असलेले 19 हजार 233 नागरिक आहेत. कृष्ण नगर येथे आढळून आलेल्या रुग्णाच्या परिसरामध्ये 47 आरोग्य पथकामार्फत 2 हजार 152 घरांचे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. तर बिनबा गेट परिसरामध्ये 4 आरोग्य पथकामार्फत 190 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT