Through Mahatma Gandhi Grameen Rozgar Yojana, works will be done in schools and Anganwadi areas and this will open the beauty of Zilla Parishad schools in the state..jpg 
विदर्भ

'जैतादेही’ पॅटर्नमुळे खुलणार शाळांचे सौंदर्य ; मनरेगामार्फत होणार सर्व कामे

श्रीनाथ वानखडे

मांजरखेड (अमरावती ) : देशाचे भावी आधारस्तंभ शाळेतील विद्यार्थी असून त्यांचे शिक्षण आनंददायी होण्यासाठी शालेय परिसर सुद्धा उत्साहवर्धक व आनंदायी असणे आवश्यक आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना (मनरेगा) मार्फत आता शाळा व अंगणवाडी परिसरातील भौतिक कामे होणार असून यामुळे राज्यातील जिल्हा परिषद शाळांचे सौंदर्य खुलणार आहे.

पंचायत समिती चिखलदरा येथील जिल्हा परिषद शाळा जैतादेही येथील शिक्षकांनी मुलांना शालेय पोषण आहारात फळे ही चाखायला मिळावी म्हणून विविध फळझाडे लावण्याचे नियोजन केले, परंतु पाण्याचा गंभीर प्रश्न असल्यामुळे त्यांनी पंचायत समितीकडे सहकार्याचे आवाहन केले. गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी शिक्षकांची आत्मीयता बघत स्वतः रोजगार हमी योजनामार्फत या कामाचे नियोजन केले. गावातील लोकांना गावातच रोजगार मिळावा शिवाय शालेय मंदिराचे सौंदर्य खुलावे म्हणून त्यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला.

पालकमंत्री यशोमती ठाकूर व नियोजन विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी सुद्धा अधिकाऱ्याची कल्पकता ओळखत सुरुवातीला जिल्हातील ८३० शाळांचे प्रस्ताव मागितले. अमरावती जिल्हातील जैतादेही प्रमाणे राज्यातील इतर शाळांचा विकास व्हावा म्हणून नुकताच (दि.०१ डिसेंबर) ला  शासनाने मनरेगाद्वारे शाळा व अंगणवाड्यांचा भौतिक विकास करून शैक्षणिक उपयोग करणेबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला. यामध्ये जैतादेहीचा प्रामुख्याने उल्लेख असून राज्यभरातील जिल्हा परिषद शाळाचे सौंदर्य या शासन निर्णयामुळे खुलणार आहे.

रोजगारासह शालेय सुविधा 

‘मी समृद्ध तर गावं समृद्ध’ ही योजना मुळात स्वयं समृद्धीकडून गावं समृद्ध करणारी आहे. लहान वयात मुलांना सेंद्रीय शेती व सुदृढ आरोग्य समृद्ध व्हावे म्हणून परिसर स्वच्छ असणे किती गरजेचे आहे. याची जाणीव व्हावी म्हणून आम्ही ही सुरुवात केली. शासन निर्णयामुळे आता गावकऱ्यांना गावात रोजगार व शालेय सुविधेत वाढ होणार असल्याचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी सांगितले  

निर्णयामुळे होणारा फायदा

यामुळे किचन शेड, खेळाचे मैदान, वृक्षलागवड, संरक्षक भिंत, रस्ते, भूजल पुनर्भरण, शौचालय, परसबाग, पेविंग ब्लॉक, नाली बांधकाम, बोअरवेल, गांडूळ खत निर्मिती इत्यादी कामे करता येणार आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT