tiger  
विदर्भ

रात्री अचानक दारावर पडली थाप; उघडताच समोर दिसला वाघ अन् घडली थरकाप उडवणारी घटना

सकाळ डिजिटल टीम

सिंदेवाही(चंद्रपूर) : घरात गाढ झोपेत असलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून जखमी केले. ही घटना शनिवारी (ता. १७) रात्री बारा वाजताच्या सुमारास सिंदेवाही वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या खैरी या गावात घडली. जखमी महिलेचे नाव सुनंदा मेश्राम (वय ६०) असे आहे. तिच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मागील आठवड्यात वाघाने एकाच कुटुंबातील दोघांवर हल्ला करून ठार केले होते. सिंदेवाही वनपरिक्षेत्रात खैरी हे गाव येते. या गावातील सुनंदा मेश्राम जेवण आटोपल्यानंतर झोपल्या होत्या. रात्रीच्या सुमारास गावात वाघाने प्रवेश केला. मेश्राम यांच्या गोठ्यातील शेळीवर वाघाने हल्ला केला.

त्यानंतर घरातील दरवाजावर थाप दिली. कुणी तरी आले असेल म्हणून सुनंदा मेश्राम यांनी दार उघडले. दार उघडून बघितल्यावर समोर वाघ होता. काही कळायच्या आत वाघाने तिच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यांनी आरडाओरड सुरू केली. गावकरी धावतपळत आले. त्यानंतर वाघाने तेथून धूम ठोकली. हृदयद्रावक! गेला नवरीला आणायला पण घरी आला मृतदेह! लग्नसोहळा आटोपताच नवरदेवाचा मृत्यू

जखमी अवस्थेत सुनंदा मेश्राम यांना ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून वाघाने या भागात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जंगलाशेजारी गावातील नागरिकांनी केली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought News : राज्यातील आणखी १८ तालुक्यात दुष्काळ?, पिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश; सांगली जिल्ह्यातील दोन तालुक्यांचा समावेश

IND vs WI 2nd T20I: अभिषेक शर्माला जगात भारी बनण्याची संधी; सूर्यकुमारचा वर्ल्ड रेकॉर्ड निशाण्यावर, बाबरचाही विक्रम करणार उद्ध्वस्त

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १० हजारांहून अधिक धावा; भारतात जन्मलेल्या या क्रिकेटपटूने ठोकला क्रिकेटला रामराम! पार्थिवसोबतही केलंय ओपनिंग!

Maharashtra Live News : गोवा एक्स्प्रेसमधून ५० विद्यार्थी ताब्यात

थकलेला चेहरा, डोक्यावर टक्कल, छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेच्या हिरोची ही अवस्था, तुम्ही ओळखलंत का?

SCROLL FOR NEXT