Tiger 
विदर्भ

रात्रीची वेळ…गावात शांतता…अन् वाघाचा प्रवेश... 

साईनाथ सोनटक्के

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : घराशेजारी असलेल्या गोठ्यातील गायीवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना तालुक्‍यातील खरबी-माहेर येथे शुक्रवारी (ता. २८) उघडकीस आली. गावात प्रवेश करून वाघाने गायीची शिकार केल्याच्या घटनेने नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले आहे. वाघाने गोठ्यातील गायीला ठार केल्याच्या घटनेची पुन्हा आठ वर्षांनंतर गावात पुनरावृत्ती झाली आहे. 

माहेर येथील दिलीप मोतीराम आडकिने यांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. शेतीसोबतच त्यांनी जोडधंदा म्हणून दुधविक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. त्यासाठी दुधाळ जनावरे खरेदी केली होती. या जनावरांच्या वास्तव्यासाठी त्यांनी गोठा बांधला आहे. आडकिने यांनी गुरुवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे जनावरे गोठ्यात बांधली होती. रात्रीच्या सुमारास वाघाने गोठ्यात प्रवेश करून गायीला ठार केले. 

रात्रीच्या सुमारास गोठ्यातील जनावरांना गवत टाकण्यासाठी गेले असता गाय मृत्तावस्थेत आढळून आली, तर वाघ गोठ्यापासून काही अंतरावर जाताना दिसला. त्याला पाहताच त्यांनी आरडाओरड केली. नागरिकांनी धाव घेतल्यानंतर वाघाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.

घटनेची माहिती सरपंच नीतेश राऊत यांनी वनविभागाला दिली. वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. गायीच्या मृत्यूने आडकिने यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वनविभागाचे तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे. 


संपादन ः राजेंद्र मारोटकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT