tiger found dead in farm in Gondia disrict  
विदर्भ

गोंदिया जिल्ह्यातील लोधीटोलामधील शेतात आढळला वाघाचा मृतदेह; वनविभागाला मृत्यूचे कारण कळेना

मुनेश्‍वर कुकडे

गोंदिया ः तालुक्‍यातील लोधीटोला (चुटीया) येथील शेतात वाघाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. ही घटना सोमवारी (ता.१६) सकाळी उघडकीस आली. या वाघाची शिकार झाली की, आणखी कोणत्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला, याचा तपास वनविभाग करीत आहे. 

लोधीटोला येथील बघेले व शरणागत यांच्या शेतात वाघाचा मृतदेह असल्याची माहिती गावकऱ्यांनी शेतमालकांना रविवारी (ता.१५) सायंकाळी दिली. त्यांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाने लागलीच रात्रभर पाळत ठेवली. सोमवारी (ता.१६) सकाळी ९.३० च्या सुमारास वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व वन्यप्रेमी घटनास्थळी गेले. सोबत पीटर हे श्‍वानपथकदेखील होते. 

शेतात पाहणी केल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी वाघाचे अवशेष आढळून आले. १० ते १२ दिवसांपूर्वी या वाघाचा मृत्यू झाला असावा, असे मृतदेहावरून दिसून आले. वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले वाघाच्या मांस व हाडाचे तुकडे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गोळा करून पांगळी येथील नर्सरीत दहन केले. 

घटनास्थळी विद्युत खांब असून, काही जनावरांचे पगमार्क आढळून आल्याने वाघाची शिकार झाली की, अन्य कोणत्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला, हे कळू शकले नाही. वाघाचा मृतदेह कुजलेला असल्याने नर की मादी हेदेखील कळू शकले नाही, असे वन्यप्रेमींनी सांगितले. 

घटनास्थळी उपवनसंरक्षक कुलराजसिंग, सहायक उपवनसंरक्षक राजेंद्र सदगीर, क्षेत्रसहायक आकरे, साठवणे, दखने, वन्यजीवप्रेमी सावन बहेकार, मानद वन्यजीव रक्षक मुकुंद धुर्वे व पशुधन वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक गजरे, डॉ. डी. डी. कटरे, डॉ. ए. डी. जऊळकर उपस्थित होते.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET 2026 री-एग्झामचा सुद्धा पेपर झाला लीक? टेलिग्रामवरील दाव्यांची NTA कडून सायबर क्राइमकडे चौकशी

Nagpur News : पुन्हा ‘नीट’ परीक्षा देण्याची हिम्मत नाही; विद्यार्थिनीने गळफास घेऊन संपविले जीवन, सुसाइड नोटमुळे खळबळ

Monsoon Alert: मुंबईत ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा २४ वेळा धडकणार! सर्वात मोठी भरती कधी येणार? मान्सूनसोबत हाय टाइडचाही धोका

Indian Visa Regulations: परदेशी नागरिकांसाठी भारताचे व्हिसा नियम बदलले; एका चुकीमुळे होऊ शकते मोठी कारवाई!

Pune Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची माघार; 'या' कारणामुळे घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT