Tiger leopard attack kills woman terror among the citizens chandrapur
Tiger leopard attack kills woman terror among the citizens chandrapur  sakal
विदर्भ

वाघ, बिबट्याच्या हल्ल्यात गुराखी महिला ठार; नागरिकांत दहशतीचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला आहे. मारोडा जंगलात जनावरे चराईसाठी घेऊन गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. तर, दुर्गापूर परिसरात अजूनही बिबट्याची दहशत संपली नाही. या परिसरात बिबट्याने एका ४५ वर्षीय महिलेचा नरडीचा घोट घेतला. या दोन्ही घटना एक मे रोजी घडल्या. मृतांची नावे गजानन गुरनुले (वय ६०, रा. मारोडा) आणि गीता मेश्राम (वय ४५, रा. दुर्गापूर) अशी आहेत. या घटनांमुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले आहे.

दुर्गापुरातील वॅार्ड क्रमांक तीन येथे गीता मेश्राम राहतात. जेवण झाल्यानंतर त्या घराशेजारीच बसून होता. तेव्हाच बिबट्या तिथे आला. त्याने गीता मेश्राम यांच्यावर हल्ला करून ठार केले. बिबटच्या आवाज आल्याने नागरिकांनी जाऊन बघितले असता त्यांना गीता मेश्राम मृतावस्थेत दिसून आल्या. त्यानंतर या घटनेची माहिती नागरिकांनी वनविभाग, पोलिसांना दिली. दोन्ही विभागाचे अधिकारी घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामा केला.या घटनेने परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

दुर्गापूर, उर्जानगर, चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वाघ, बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. दोन महिन्यांपूर्वीच दुर्गापुरातील एका सोळा वर्षीय आणि आठ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. त्यानंतर वन विभागाने दुर्गापूर, ऊर्जानगर, चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र परिसरात पिंजरे लावले. वनकर्मचाऱ्यांची गस्त वाढविली होती. त्यानंतर काही दिवसांनी एका बिबट्याला जेरबंदही करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही आज बिबटाने पुन्हा एक बळी घेतला.

दुसरी घटना मूल तालुक्यात घडली. जनावरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. तालुक्यातील मारोडा गावातील गजानन गुरनुले हे नेहमीप्रमाणे गावाजवळील जंगलात बैल चरावयास गेला होते. संध्याकाळच्या वेळीस गावात बैल आले. पण बैल राखणारा गजानन परत न आल्याने गावकऱ्यांनी शोधाशोध घेण्यास सुरुवात केली.

जिथे तो बैल चारावायला गेला, त्या शेतात रात्री त्यांची टोपी आणि थोड्या अंतरावर त्यांचे धोतर दिसले. त्याच दिशेने शोधत सोमनाथ डोंगराच्या पायथ्याशी डोंगरदेवीच्याजवळ गजाननचा मृतदेह आढळला. याची माहिती वनविभाग आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. सध्या मारोडा गावाच्या शेतशिवारात वाघाचा वावर वाढला आहे. मृतावर यापूर्वी २०२१ उन्हाळ्याच्या काळात वाघाने हल्ला केला होता. मात्र, त्या हल्ल्यात ते जखमी झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT