सिहोरा : हल्ला करून वीरेंद्र शहारेच्या अंगावर बसलेला वाघ.  
विदर्भ

वाघ होता छाताडावर; तरीही हारली नाही हिंमत...अंगावर शहारे आणणारी ही बातमी वाचाच

सकाळ वृत्तसेवा

सिहोरा (जि. भंडारा) : मागच्या रविवारी (ता. 19) गोंदेखारी शिवारात वाघाने गणेश बनकर या शेतकऱ्यावर हल्ला करून जखमी केले होते. त्यानंतर हा वाघ ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळाच्या जंगलात पळून गेल्याची माहिती वनविभागाने दिली होती.

परंतु, हा वाघ याच परिसरात तळ ठोकून होता. शनिवारी सिहोरा येथील आठवडी बाजार असल्याने तुमसर-बपेरा राज्यमार्गावर रहदारी सुरू होती. बिनाखी गावाच्या शिवारात राज्यमार्गावर झुडपात वाघ दडून बसला होता.

दुचाकीचालकांवर केला हल्ला

याच मार्गाने गोंदेखारी येथील छोटेलाल ठाकरे (वय 35) हा दुचाकीने जात होता. यावेळी वाघाने अचानक हल्ला केल्याने छोटेलाल जखमी झाला. याचवेळी मिरजपूर/पांढराबोडी (मध्य प्रदेश) निवासी शंकरलाल तुरकर (वय 60) हेसुद्धा दुचाकीने जात होते. त्यांनाही वाघाने हल्ला करून जखमी केले. ही घटना राज्यमार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांच्या लक्षात येताच त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यामुळे वाघाने शेतशिवारात पलायन केले.

सकाळपासूनच वाघाचा धुमाकूळ

नागरिकांच्या मदतीने जखमी छोटेलाल ठाकरे, शंकरलाल तुरकर, आणि विजय शहारे यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळापासून वनविभागाचे कार्यालय चार किलोमीटर अंतरावर आहे. सकाळपासूनच वाघाने धुमाकूळ घातल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी यांना मोबाईलवरून देण्यात आली होती. परंतु, दोन तासांनंतर वनविभागाची चमू घटनास्थळी पोहोचली.

जेरबंद करण्याची जबाबदारी वनविभागाची

गोंदेखारी गावात वाघ दिसल्यानंतर त्याला जेरबंद करण्याची जबाबदारी वनविभागाने पार पाडली नाही. घटनास्थळावर पोलिस निरीक्षक ठाकूर यांनी आपल्या चमूसह दाखल होत वाघाला पाहण्यासाठी धावणाऱ्या नागरिकांना रोखून धरले. सध्या बिनाखी शेतशिवारात वाघाने ठाण मांडले असून वनविभाग त्याच्या हालचालीवर नजर ठेवून आहे.

मृत्यूच्या दाढेतून सुटका

वाघ आल्याची माहिती होताच हजारो नागरिकांनी वाघाला पाहण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी शेतशिवारात उभ्या असलेल्या गर्दीतील वीरेंद्र शहारे (वय 45, रा. सिंदपुरी) याच्यावर वाघाने हल्ला केला. त्याच्या कंबरेचा चावा घेतला.

छाताडावर साक्षात मृत्यू

तब्बल 10 ते 15 मिनिटे वाघ वीरेंद्रच्या अंगावर बसून होता. जणूकाही वीरेंद्रच्या छाताडावर साक्षात मृत्यू बसून असल्याने तो निपचित पडून होता. नागरिकांना गलका करीत वाघाच्या दिशेने धाव घेतल्याने तो कालव्यात पळून गेला. नशीब बलवत्तर होते म्हणून वाचले त्याचे प्राण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT