tiger enters in payvihir forest in pathrot of amravati 
विदर्भ

पायविहिरच्या जंगलात वाघिणीची 'एन्ट्री', पाऊलखुणांवरून पटली खात्री

आनंद चिठोरे

पथ्रोट ( जि. अमरावती ) : जिल्ह्यातील पथ्रोटजवळच्या पायविहिरीच्या जंगलात वाघिणीच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत. त्यामुळे या भागात वाघिणीची एंट्री झाल्याची खात्री पटली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

गेल्या वर्षी सुद्धा याच महिन्यात वाघाची एन्ट्री झाल्याचे पुरावे मिळाल्याने त्याला पिटाळून लावण्यासाठी वन विभागाची प्रचंड दमछाक झाली होती. त्यावेळी जातांगपूरच्या शेत शिवारात तसे पुरावे मिळाले होते. ते पुढे वलनीच्या जंगलापर्यंत दिसून आले होते. त्यावेळी शेतकरी व शेतमजुरांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती. त्यासाठी तब्बल एक महिन्यापर्यंत वनविभागाच्या चमूने इथे मुक्काम ठोकून यंत्रणा राबविली होती. तेव्हा शेतात मिळालेल्या पाऊलखुणांच्या आधारे सदरचा वाघ हा नर जातीचा असल्याचे समोर आले होते. यंदा पुन्हा पायविहिरच्या जंगलात वनहक्क दक्षता समितीच्या सदस्यांना पेट्रोलिंग करताना या पाऊलखुणा आढळून आल्या. त्या वाघिणीच्या असल्याचे समोर आले आहे.

वाघिणीच्या पाऊलखुणा -

सदरच्या पाऊलखुणा या वाघिणीच्या आहेत, असे निसर्गप्रेमी अभ्यासक तथा स्टॅण्डिंग फॉर टायगर फाउंडेशनचे अल्केश ठाकरे यांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT