toll-tax. 
विदर्भ

टोलनाक्यावर होतेय पैशांची देवाणघेवाण, त्यातून कोरोना प्रवेशणार तर नाही?

गजानन बाजारे

कारंजा घाडगे (जि. वर्धा)  : अजूनही वर्धा जिल्हा कोरोनाच्या विळख्यापासून दूर आहे. मात्र टोलनाक्यावरचे व्यवहार कोरोना संक्रमणाला कारणीभूत ठरू शकतात. ही भिती नागरिकांना वाटते आहें
 ओरिएंटल पाथवेज टोल नाका लॉकडाऊनमध्ये शासनाचे आदेश येताच बंद करण्यात आला होता, पण आता पुन्हा नव्याने आदेश आल्याने सुरू करण्यात आला. या मार्गाने जाणाऱ्या वाहनचालकांकडून टोल वसुलीला सुरुवात झाली आहे. वाहनधारक नगदी पैसे देऊन टोल भरतात. त्यामुळे येथील बुथवर मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण होते. हा टोल नाका राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर असल्यामुळे आवागमन करणारी वाहने ही भारतातील सर्व भागातून आलेली असतात.                            कोरोनाबाधित जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनचालकांमुळे कोरोनाचे संक्रमण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. जवळपास एकूण वाहनांच्या निम्मी वाहने ही फास्टट्रक पद्धतीचा अवलंब करणारी असल्यामुळे त्यांचा प्रत्यक्ष संबंध येथील कर्मचाऱ्यांशी येत नाही, पण उर्वरित वाहनचालक टोल भरण्याकरिता आपल्या हाताने येथील कर्मचाऱ्यांच्या हातात नोटा देतात. त्यामुळे कोरोना विषाणूचे संक्रमण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.    अनेक वाहनचालक कोरोनाच्या दृष्टीने हॉटस्पॉट असलेल्या व रेडझोन असलेल्या ठिकाणाहून येतात. टोलनाक्‍यावर कार्यरत बहुतांश कर्मचारी कारंजा गावातील व परिसरातील आहे.
टोल बूथवर वाहनचालकांकडून पैसे स्वीकारल्यानंतर ही सर्व रक्कम रोखपालाकडे जाते. तेथून ती बॅंकेत पाठवली जाते. टोल नाका प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून कर्मचाऱ्यांकरिता सॅनिटायझर, मास्कची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, कोरोनाबाधित शहरातून आलेल्या चालकाच्या हातून दिलेल्या नोटांमुळे संक्रमणाची शक्‍यता जास्त आहे.
त्यामुळे या टोल नाक्‍यावरील रोख व्यवहार बंद करावा, पूर्णतः कॅशलेस किंवा फास्टट्रॅक अशी व्यवस्था होत असेल तरच हा टोल सुरू ठेवावा, अन्यथा बंद करावा, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

कोरोनाचे संक्रमण
कोरोनाची लक्षणे असणाऱ्या चालकाने टोल बुथवरील कर्मचाऱ्याला पैसे दिले तर त्या माध्यमातून कोरोनाचे संक्रमण होऊ शकते.
डॉ. प्रभाकर वंजारी
वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय कारंजा

टोलचा भरणा रोखीने                                                                             या टोल नाक्यावरून आवागमन करणाऱ्या एकूण वाहनांपैकी 52 टक्‍के वाहने ही फास्टट्रक आहे. तर 1 टक्का वाहनचालक हे कार्डचा वापर करतात. तर उर्वरित सर्व वाहनचालक टोलचा भरणा रोखीने करतात.
रवींद्र वैद्य
व्यवस्थापक, ओरिएंटल पाथवेज कारंजा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT